Others News

सध्या देशातील सर्वात मोठ्या पाच मौल्यवान कंपन्यांच्या यादीतूनही एलआयसी बाहेर पडली आहे. तसेच सध्या एलआयसीचे बाजार मुल्य 77,600 कोटी रुपयांहून खाली आले आहे. शुक्रवारी एलआयसीच्या मुल्यात २२ हजार कोटींची घसरण झाली. हिंदुस्थान युनिलिव्हर पुन्हा एकदा पाचव्या क्रमांकावर आली आहे.

Updated on 21 May, 2022 2:24 PM IST

सध्या देशातील सर्वात मोठ्या पाच मौल्यवान कंपन्यांच्या यादीतूनही एलआयसी बाहेर पडली आहे. तसेच सध्या एलआयसीचे बाजार मुल्य 77,600 कोटी रुपयांहून खाली आले आहे. शुक्रवारी एलआयसीच्या मुल्यात २२ हजार कोटींची घसरण झाली. हिंदुस्थान युनिलिव्हर पुन्हा एकदा पाचव्या क्रमांकावर आली आहे. यामुळे सर्वसामान्यांनाही पैसे कमविण्याची भुरळ पाडणारी सरकारी कंपनी एलआयसीने सर्वांचेच अंदाच चुकविले आहेत. यामुळे याची चर्चा सुरु आहे.

शुक्रवारी एलआयसीचा शेअर आतापर्यंतच्या खालच्या स्तरावर 825 रुपयांवर बंद झाला. असे असताना आता हे शेअर ठेवायचे की विकायचे या दुविधेत हे गुंतवणूकदार आहेत. आता विकले तरी नुकसान होणार आणि ठेवल्यावर पुन्हा घसरले तरी नुकसान होणार आहे. यामुळे त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. सध्या एलआयसीवर आंतरराष्ट्रीय परिस्थितींमुळे नकारात्मक परिणाम दिसत आहे.

असे असले तरी ही एक मोठी आणि विश्वासार्ह कंपनी आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी दीर्घ काळासाठी हे शेअर होल्ड करावेत. येत्या काही वर्षांत चांगल्या व्यवसायाची शक्यता आहे. पॉलिसीधारकांना ६० रुपये आणि कर्मचाऱ्यांना ४५ रुपयांची सूट देण्यात आली होती. हे शेअर 942 रुपयांना अलॉट झाले होते. रिटेल गुंतवणूकदारांना देखील ४५ रुपयांचा डिस्काऊंट दिला गेला होता. याच्या सगळ्या घडामोडींवर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.

मोठी बातमी! एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा, साखर सहसंचालकांचे आदेश

शुक्रवारी शेअर बाजार उसळला होता, तरी एलआयसीच्या शेअरमध्ये काही फरक झाला नाही. सध्या आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाल्यावर जी कोसळण्यास सुरुवात झाली ती सतत चार दिवस सुरु होती. यामुळे आता यामध्ये अजून काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
..तेव्हाच पेरणी करा, कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले आवाहन
आताची सर्वात मोठी बातमी! पेट्रोल- डिझेल होणार स्वस्त, मोदी सरकारने थेट तारीखच सांगितली..
अतिरिक्त उसाचा प्रश्न कोणामुळे? शिल्लक उसाची खरी कारणे आली समोर...

English Summary: Now LIC cheated! Out of the five big companies, investors' tension increased
Published on: 21 May 2022, 02:24 IST