Others News

व्हाट्सअप आता बहुतांशी सगळे जण वापरतात. आपल्याला माहित आहेच कि व्हाट्सअप वर वेगवेगळ्या विषयांशी संबंधित ग्रुप असतात व या ग्रुपचे ॲडमिन यांच्या हातात बऱ्याच प्रकारचे नियंत्रण या ग्रुपचे असते. परंतु ग्रुपवर आलेला एखादा फोटो अथवा व्हिडिओ ग्रुपमधील सर्व मेम्बर्स साठी डिलीट करणे हे ग्रुप एडमिनला शक्य नव्हते.

Updated on 07 August, 2022 1:58 PM IST

व्हाट्सअप आता बहुतांशी सगळे जण वापरतात. आपल्याला माहित आहेच कि व्हाट्सअप वर वेगवेगळ्या विषयांशी संबंधित ग्रुप असतात व या ग्रुपचे ॲडमिन यांच्या हातात बऱ्याच प्रकारचे नियंत्रण या ग्रुपचे असते. परंतु ग्रुपवर आलेला एखादा फोटो अथवा व्हिडिओ ग्रुपमधील सर्व मेम्बर्स साठी डिलीट करणे हे ग्रुप एडमिनला शक्य नव्हते.

परंतु आताग्रुप ॲडमीनला व्हाट्सअप ग्रुप वर संपूर्ण नियंत्रण ठेवता येईल असे एक फिचर लवकर येणार असून त्यानुसार आता एडमिनला कोणताही मेसेज,फोटो आणि व्हिडिओ सर्व सदस्यांसाठी डिलीट करता येणार आहे. अगदी सुरुवातीला हे जे काही फीचर येणार आहे ते काही बीटा टेस्टर्ससाठी जारी केले जाणार आहे.

नक्की वाचा:आता ठरलं तर..! देशात याच महिन्यापासून सुरू होणार 5जी सेवा, जिओची 15 ऑगस्टपासून सेवा सुरू होणार

तुम्हाला हे फिचर मिळाले आहे की नाही ते अशा पद्धतीने तपासा

 तुम्ही जो काही ग्रुप क्रिएट केला आहे त्यामध्ये हे फिचर काम करत आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचे असेल तर तुम्ही तुमचा जो काही ग्रुप आहे त्यामधील कोणताही मेसेज डिलीट करण्याचा प्रयत्न करुन पहा. तुम्ही संबंधित मेसेज डिलीट केल्यानंतर जर 'डिलिट फॉर एव्हरीवन' असा ऑप्शन आला तर समजून घ्या की तुम्हाला हे फिचर मिळाले आहे.

नक्की वाचा:काय म्हणता! आता भारतात टोलवसुली फास्टटॅगने नाही तर होणार सॅटॅलाइटने,याचा काय मिळणार फायदा?

 काय आहे या फिचरचे नाव?

 मिळालेल्या माहितीनुसार या नव्या फिचरचे नाव 'एडमिन डिलीट' असे असेल.  व्हाट्सअप एडमिनला डिलीट फोर एवरी वन चा अधिकार देणारे हे फिचर काही बीटा टेस्टर्सना वापरकर्त्यानाच मिळणार आहे.

 यासाठी अशी करा प्रक्रिया

1- अगोदर व्हाट्सअप चॅट मध्ये जाऊन तुम्हाला जो मेसेज डिलीट करायचा आहे त्यावर बोट ठेवा व तो मेसेज सिलेक्ट करा.

जर तुम्हाला एका पेक्षा जास्त मेसेज डिलीट करायचे असतील तर त्यांच्यावरही बोट ठेवून सिलेक्ट करा. त्यानंतर वरील डिलीट आयकॉन वर बोट ठेवा. त्याच्यामध्ये डिलीट फॉर एव्हरीवनचा पर्याय निवडा. ही प्रक्रिया केल्यानंतर संबंधित मेसेज डिलीट होईल.

नक्की वाचा:Banking:कोणत्या बँकेचे ग्राहक एका दिवसात यूपीआय द्वारे किती पैसे पाठवू शकता? वाचा बँकेनुसार माहिती

English Summary: now get speciel right to whatsapp group admin to delete msg and vidio
Published on: 07 August 2022, 01:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)