Others News

केंद्र सरकार समाजातील सर्व घटकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि प्रत्येक नागरिकाने त्याच्या पायावर उभे राहावे यासाठी बऱ्याच प्रकारच्या योजना आखल्या असून त्यांची अंमलबजावणी देखील केली जात आहे.

Updated on 06 June, 2022 2:51 PM IST

 केंद्र सरकार समाजातील सर्व घटकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि प्रत्येक नागरिकाने त्याच्या पायावर उभे राहावे यासाठी बऱ्याच प्रकारच्या योजना आखल्या असून त्यांची अंमलबजावणी देखील केली जात आहे.

केंद्र सरकारच्या बऱ्याच योजनांच्या माध्यमातून तरुण युवकांना किंवा शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. परंतु नेमके सरकारच्या या प्रत्येक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. तरीसुद्धा असे मिळणारे लाभ कर्जरूपाने वेळेत मिळतीलच याची शाश्वती नसते.

या सगळ्या कटकटी मध्ये अगदी सहजरीत्या घरबसल्या ऑनलाइन कर्ज मिळाले किंवा योजनांचा लाभ घेता आला तर  खूपच फायदेशीर  बाब होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर आता एक आनंदाची बातमी आहे की केंद्र सरकारने नागरिकांसाठी एक पोर्टल सुरू केले असून या माध्यमातून आता

शासनाच्या ज्या काही विविध प्रकारच्या योजना आहेत व त्या योजनेनुसार जे काही कर्ज दिले जाते ते आता ऑनलाईन पद्धतीने या पोर्टलच्या माध्यमातून दिले जाणार आहे. या पोर्टल चे नाव जन समर्थ पोर्टल असून या पोर्टलचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

नक्की वाचा:म्हातारपण करा आरामदायी, घ्या लाभ 'या' योजनेचा मिळवा दरमहा 5 हजार रुपये

काय आहे नेमके जन समर्थ पोर्टल?

 केंद्र सरकारचे चार कर्ज श्रेणीतील तेरा योजना आहेत. या सगळ्या योजना या पोर्टलला लिंक करण्यात आले आहेत व सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वित्तीय संस्था कर्ज देतात अशा एकशे पंचवीस हून अधिक संस्थांचे या पोर्टलवर नोंदणी आहे.

 या योजनांमध्ये स्टार्टअप इंडिया, पंतप्रधान मुद्रा योजना यापैकी तरुणांना कोणत्या योजनेच्या माध्यमातून कर्जाचा लाभ घ्यायचा आहे हे आता पटकन निश्चित करता येणार असून कमीत कमी कर्जासाठी प्रक्रिया करावी लागणार असून अधिकाधिक जणांना या माध्यमातून कर्ज मिळू शकणार आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

एनएसडीएल, इन्कम टॅक्स डिपारमेंट आणि युआयडीएआय यासारख्या सरकारी संस्था देखील या पोर्टलवर जोडल्या गेल्या आहेत. या सगळ्या संस्थांमुळे संबंधित  लाभार्थ्याच्या सगळा डेटा डिजिटल पद्धतीनेपडताळणी करणे आता सोपे होणार आहे व कर्जदारांना होणारा त्रास कमी होईल.जसे तुम्हाला नेमके कोणते आणि किती कर्ज हवे आहे हे तुम्ही ठरवू शकणार आहेत कारण या पोर्टल वर वेगवेगळ्या ऑफर्स तुम्हाला पाहता येणार आहेत.

नक्की वाचा:मोदी सरकारची 10 लाखांची घोषणा! आता मिळणार हमीशिवाय 10 लाखांचे कर्ज, असा करा अर्ज...

असा अर्ज करावा?

 सध्या यावर चार कर्जाच्या श्रेणी असून प्रत्येक कर्ज श्रेणीत सरकारच्या काही योजना आहेत. यामध्ये तुम्हाला अर्ज करतेवेळी काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील  व या उत्तर यांच्या माध्यमातून तुमची या योजनेच्या अंतर्गत असलेली पात्रता तपासली जाईल.

यासाठी तुम्हाला  आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रे लागतील तसेच पोर्टल वर आवश्यक  काही माहिती असेल ती नमूद करावी लागेल.या पोर्टलचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या पोर्टलवर कर्जासाठी कोणताही भारतीय नागरिक अर्ज करू शकतो.

फक्त यामध्ये तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज करत आहात त्या योजनेच्या कर्जासाठी पात्र असाल तर ऑनलाइन माध्यमातून तुम्ही कर्जासाठी अर्ज करून कर्ज मिळवू शकतात.

नक्की वाचा:अगदी 5 ते 10 हजार रुपयांमध्ये हँडवॉश व्यवसाय सुरू करा अन मिळवा प्रतिमहिना 25 ते 30 हजार

English Summary: now get quick loan of government scheme by jansamarth portal
Published on: 06 June 2022, 02:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)