Others News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात इपीएफओच्या सदस्यांसाठी आता कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या विविध कामांच्यासाठी डीजीलॉकरच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच्या साह्याने आता सदस्यांना त्यांचं पेन्शन पेमेंट ऑर्डर अर्थात पीपीओ नंबर, युएएन कार्ड आणि स्कीम सर्टिफिकेट देखील डाऊनलोड करता येणार आहे.

Updated on 31 August, 2022 11:03 AM IST

 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात इपीएफओच्या सदस्यांसाठी आता कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या विविध कामांच्यासाठी डीजीलॉकरच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच्या साह्याने आता सदस्यांना त्यांचं पेन्शन पेमेंट ऑर्डर अर्थात पीपीओ नंबर, युएएन कार्ड आणि स्कीम सर्टिफिकेट देखील डाऊनलोड करता येणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसंघटनेशी संबंधित सर्व प्रकारची कागदपत्रे आता डिजिलॉकर च्या माध्यमातून तुम्हाला डाऊनलोड करता येणार आहेत.

नक्की वाचा:Epfo Rule: पीपीओ नंबर आणि पेन्शन यांचा काय आहे संबंध? हा नंबर कसा मिळतो? वाचा सविस्तर

 नेमके डिजिलॉकर कशाला म्हणतात?

 डिजिलॉकर ही सुविधा डिजिटल इंडिया प्रोग्रामच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण सुविधा आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या माध्यमातूनही सुविधा काम करते. या सुविधेच्या माध्यमातून नागरिकांना डिजिटल डॉक्युमेंट वॉलेट उपलब्ध करून दिले आहे.

जे खरे खुरे डिजिटल दस्तऐवज आहेत ते नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांचे डिजिटल सबलीकरण करणे यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

नक्की वाचा:Agri Bussiness: ऍग्री बिझनेस सेंटर म्हणजे नेमके काय? काय आहे याचे व्यावसायिक स्वरूप?

 ईपीएफओ सदस्यांसाठी पीपीओ नंबर असतो महत्वाचा

 तुम्हाला माहीत असेलच की पेन्शन पेमेंट ऑर्डर अर्थात पीपीओ नंबर हा निवृत्‍तीवेतन धारकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. जर तुमचा हा नंबर हरवला तर तुमची पेन्शन सुद्धा बंद होण्याची शक्यता असते.जेव्हा एखादा कर्मचारी एखाद्या कंपनीतून रिटायर्ड अर्थात निवृत्त होतो

अशावेळी संबंधित व्यक्तीला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओ कडून एक पीपीओ क्रमांक दिला जातो. कारण या क्रमांकाशिवाय पेन्शन मिळणे शक्यच नाही त्यामुळे हा क्रमांक असणे खूप गरजेचे आहे.

नक्की वाचा:Information: भावांनो! आधार कार्ड अपडेट विषयीचे 'हे' नियम प्रत्येकाला माहिती असणे आहे गरजेचे, वाचा सविस्तर

English Summary: now can epfo holders download some important documents with digilocker
Published on: 31 August 2022, 11:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)