Others News

मोटोरोलाने मागील काही दिवसांपूर्वी जगातील पहिला दोनशे मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन 'Moto Edge 30 Ultra' या नावाने लाँच करण्यात आला होता. या फोनचे जबरदस्त वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 200 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तर आहेच परंतु 60 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा सुद्धा यामध्ये देण्यात आला आहे. एवढेच नाही तर पावर बॅकअपसाठी 125W फास्ट चार्जिंग सपोर्ट घेण्यात आला आहे.

Updated on 30 September, 2022 1:28 PM IST

मोटोरोलाने मागील काही दिवसांपूर्वी जगातील पहिला दोनशे मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन 'Moto Edge 30 Ultra' या नावाने लाँच करण्यात आला होता. या फोनचे जबरदस्त वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 200 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तर आहेच परंतु 60 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा सुद्धा यामध्ये देण्यात आला आहे. एवढेच नाही तर पावर बॅकअपसाठी 125W फास्ट चार्जिंग सपोर्ट घेण्यात आला आहे.

नक्की वाचा:Mobile News: 3 ऑक्टोबरला येत आहे 'मोटोरोला'चा कमी किमतीत दमदार स्मार्टफोन, वाचा वैशिष्ट्य आणि किंमत

 या फोनचा कॅमेऱ्याची वैशिष्ट्ये

 या स्मार्टफोनमध्ये उत्तम फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट करतो.  ज्यामध्ये 200 मेगापिक्सलचा सॅमसंग आयसोसेल HP1 सेंसर देण्यात आले आहे. एवढेच नाही तर पन्नास मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्स आणि बारा मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स देण्यात आला आहे. उत्तम व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फी साठी मोटोरोलाचा या स्मार्टफोनमध्ये ओम्नीव्हिजन OV60A फ्रंट कॅमेरा दिला आहे.

स्टोरेज क्षमता

 या स्मार्टफोनमध्ये बारा जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच हा जागतिक बाजारपेठेत स्टरलाईट व्हाईट आणि इंटरस्टेलर ब्लॅक या दोन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.

नक्की वाचा:Mobile Update: जबरदस्त वैशिष्ट्ये आणि परवडणाऱ्या किमतीत 'विवो'चा 'हा'आहे उत्तम स्मार्टफोन,वाचा माहिती

 इतर वैशिष्ट्ये

 मोटोरोलाचा या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनचा गोरिला ग्लास पाच प्रोटेक्ट दिले आहे.

त्यामध्ये 1250 नीट्स ब्राईटनेस आणि 1500 हर्ट्स टच संपलींग रेट यासारखे वैशिष्ट देण्यात आले आहेत. या फोनमध्ये 4610mAh बॅटरी देण्यात आली असून 125 टर्बो पावर चार्जिंग पावर सोबत 50 वॉट वायरलेस चार्जिंग व 10 वॉट रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

 स्मार्टफोनची किंमत

 या स्मार्टफोनची किंमत 72 हजार 900 रुपये आहे.

नक्की वाचा:रेशनकार्ड सुरू ठेवायचे असेल तर ताबडतोब करा 'ही' माहिती अपडेट; जाणून घ्या प्रक्रिया

English Summary: moto edge 30 ultra is world first 200 megapixal smartphone of motorola
Published on: 30 September 2022, 01:28 IST