आपण जेव्हा व्यवसाय करत असतो त्यावेळी व्यवसायामध्ये बऱ्याचदा काही बाबींमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. आपल्याला माहित आहेच की बऱ्याचदा व्यवसाय करत असताना दुकानातील मालाची चोरी देखील होते तर कधी कधी चोरीच्या घटनांमध्ये पैसेदेखील जातात. त्यामुळे अशा काही घटना घडल्या तर खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका व्यावसायिकास बसतो. यासाठी मनी इन्शुरन्स खूप फायद्याचा ठरू शकतो.
'मनी इन्शुरन्स'चे महत्व
मनी इन्शुरन्स अनेक प्रकारच्या अडचणीच्या वेळेस संबंधित ग्राहकाला एक आर्थिक आधार देतात. व्यवसायातील आर्थिक नुकसान देखील या इन्शुरन्समुळे भरून निघते. एवढेच नाही तर झालेली चोरी, दरोडामध्ये मालाची झालेली लूट इत्यादी आर्थिक संकटात पासून देखील आपल्याला संरक्षण या इन्शुरन्सच्या माध्यमातून मिळते.
बरेच व्यावसायिक असे असतात की त्यांच्या आर्थिक व्यवहार खूप मोठे असतात अशा व्यावसायिकांनी विमा काढणे खूप गरजेचे असून जेणेकरून भविष्य काळातील आर्थिक संकटात तरुन निघणे सोपे होते. अशा घटना घडल्यास व्यावसायिक विमा कंपनीकडे झालेल्या नुकसान भरपाई संबंधी क्लेम दाखल करू शकतात.
सर्व प्रकारचे लिक्वीड फंड, चेक तसेच ड्राफ्ट, ट्रेझरी नोट्स, आर्थिक चलन किंवा पोस्टल ऑर्डरच्या माध्यमातून आर्थिक विमासुरक्षाचे पैसे मिळणे शक्य आहे. या आर्थिक विम्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी जो काही प्रीमियम लागतो त्याची रक्कम खूप कमी असते. तुम्ही या पॉलिसीचा प्रिमियम मासिक, त्रिमासिक किंवा सहामाही आधारावर भरू शकतात.
मनी इन्शुरन्स काढताना फक्त त्यातील नियम व अटी काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे असून व त्यानुसार योग्य तो पर्याय निवडणे गरजेचे असते. दुकानात होणाऱ्या चोरी किंवा दरोडासारख्या घटना मुळे होणारे आर्थिक नुकसान या पासून या विम्याच्या माध्यमातून संरक्षण मिळते.
नक्की वाचा:पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असेल तर मिळेल या सरकारी योजनेतून नुकसान भरपाई
Published on: 18 September 2022, 04:35 IST