Others News

केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सोने -चांदीच्या आयातीवर (Gold-Silver Import Duty) लावण्यात येणाऱ्या इम्पोर्ट ड्युटीमध्ये म्हणजे आयात शुल्कामध्ये आता 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता सोन्या-चांदीच्या आधीच जास्त असलेल्या किंमती आता आणखी वाढणार आहेत.

Updated on 01 July, 2022 5:47 PM IST

केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सोने -चांदीच्या आयातीवर (Gold-Silver Import Duty) लावण्यात येणाऱ्या इम्पोर्ट ड्युटीमध्ये म्हणजे आयात शुल्कामध्ये आता 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता सोन्या-चांदीच्या आधीच जास्त असलेल्या किंमती आता आणखी वाढणार आहेत. सोनं खरेदी ही अनेकांच्या आवडीची गोष्ट असते. तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. मात्र आता खरेदी करताना जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात.

देशात एकीकडे महागाईने उच्चांक गाठला आहे. जीवनावश्यक गोष्टी तर महाग झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना आर्थिक झळ बसत आहे. यामध्ये आधी 7.5 टक्के असलेला हा कर आता 12.5 टक्के इतका झाला आहे. सोन्याच्या आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून सरकारनं हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.सध्या देशातील व्यापारामध्ये तोट्याचं प्रमाणही सातत्यानं वाढत आहे. मे महिन्यात उद्योग व्यापारातील हे नुकसान 24. 29 बिलियन डॉलर्स इतक्या विक्रमी स्तरापर्यंत पोहोचले होते.

त्यामुळेच सोन्यावरील आयात कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात गेल्या 10 वर्षांमध्ये सगळ्यांत जास्त सोनं 2021 मध्ये आयात (Gold Import) केलं होतं. कोरोनाच्या साथीमध्ये सोन्याची मागणी प्रचंड वाढली होती. लोकांनीही सोन्याची भरपूर खरेदी केली होती. सोन्याची तस्करी रोखण्यासाठी देशातील मोठ्या ज्वेलर्सनं इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याची मागणी केली होती.

डेअरीला दुध घालताना ही काळजी घेत का? होईल फायदा..

असे असताना भारतानं सोन्यावरील आयात कर वाढवला आहे. तर चीन,अमेरिका आणि सिंगापूरसारख्या देशांनी सोन्याच्या आयातीवरील इम्पोर्ट ड्युटीच काढून टाकली आहे. स्थानिक बाजारपेठ अधिक मजबूत करण्यासाठी या देशांनी हा निर्णय घेतला. मात्र भारतात सोन्याला प्रचंड मागणी असूनही सरकारच्या वतीने कर वाढवला आहे. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या;
आता रांगेत थांबण्याचे टेन्शन मिटणार!! CNG संपल्यावर एका कॉलवर मिळणार टाकी भरून
मगरीने मित्रासमोर तरुणाला गिळले, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, पहा फोटो
शेतकऱ्याच्या मुलाचा जगात गाजावाजा! फेसबुकवर मिळवली करोडोच्या पॅकेजची नोकरी

English Summary: Modi government increases import duty on gold by 5%, gold prices will increase ...
Published on: 01 July 2022, 05:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)