Others News

भारतातील वाढती लोकसंख्या पाहता बाजारपेठेत वस्तूंची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत वस्तूंची मागणी लक्षात घेता कॉटन इयर बड्स व्यवसाय तुमच्यासाठी एक चांगला आर्थिक पर्याय आहे. ज्यामध्ये खर्च खूप कमी आणि नफा खूप जास्त असतो.

Updated on 24 June, 2022 12:49 PM IST

 भारतातील वाढती लोकसंख्या पाहता बाजारपेठेत वस्तूंची मागणी वाढत आहे.  अशा परिस्थितीत वस्तूंची मागणी लक्षात घेता कॉटन इयर बड्स व्यवसाय तुमच्यासाठी एक चांगला आर्थिक पर्याय आहे. ज्यामध्ये खर्च खूप कमी आणि नफा खूप जास्त असतो.

केंद्र सरकार देखील मेड इन इंडिया प्रोत्साहन देत आहे आणि नवीन स्टार्ट आणि व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करत आहे. 

तुम्ही अगदी घरबसल्या इयर बड्स चा व्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायाची सविस्तर माहिती या लेखात घेऊ.

 कॉटन इयर बड्सचा व्यवसाय    

 सागर से सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या व्यवसायाची खालील प्रक्रिया अंतर्गत नोंदणी करावी लागेल.

1- फर्म नोंदणी

2- जीएसटी नोंदणी

3- व्यवसाय परवाना

4- एम एस एम ई/ एस एस आय नोंदणी

5- ईपीएफ नोंदणी

6- ट्रेडमार्क आणि आय इ सी कोड

नक्की वाचा:प्रचंड मागणी असलेल्या 'हा' व्यवसाय देईल महिन्याला लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

कॉटन इअर बड्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि पद्धती

 स्पिंडल: कॉटन बड्सचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्पिंडल, ज्याच्या दोन्ही टोकांना कापूस लावला जातो. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक मटेरियलचा वापर केला जातो मात्र पर्यावरणाचा विचार करून प्लास्टिकच्या स्पिंडल ऐवजी लाकडाचा वापर केला जात आहे.

 तुम्ही लाकडापासून बनवलेले स्पिंडल देखील आणू शकता. यांची लांबी पाच सेंटीमीटर ते 7 सेंटीमीटर असावी. अगदी नाममात्र किमतीत तुम्हाला ते बाजारात सहज मिळतात.

 कापूस: दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूस ही होय. जो तुम्ही स्पिंडल च्या दोन्ही टोकांना लावाल. कमी किमतीत तुम्हाला कापूस देखील बाजारात मिळतो.

नक्की वाचा:माफक गुंतवणुकीतून सुरू करता येणारा व्यवसाय! थोडी गुंतवणूक,जास्त नफा आणि सदैव मागणी

 चिकट पदार्थ:कापूस कळ्यांवर दोन्ही बाजूने चिकटवण्यासाठी, आपल्याला असे चिकट पदार्थ वापरावे लागेल जे त्याच्या दोन्ही टोकांना लावावे जेणेकरून चिकटवलेला कापूस त्यावर घट्ट होऊ शकेल.

 रसायने: कापसाच्या कळ्या पूर्णपणे तयार झाल्यानंतर त्यावर सेल्युलोज पोलिमर रसायन लावावे जेणेकरून कापसावर डाग पडणार नाही.

तसेच बुरशी येणार नाही. त्यामुळे कापसाच्या गाठी जास्त काळ टिकतात आणि खराब होत नाहीत.

 पॅकेजिंग पाऊच: या सर्व प्रक्रियेनंतर आता तुम्हाला पॅकेजिंगचे आकारानुसार आणि आवश्‍यकतेनुसार पॅकेजिंग पाऊस बाजारातून खरेदी करावी लागतील.

त्यावर मोजणी केल्यानंतर शंभर-शंभर कळ्या घाला. या प्रक्रियेस सह तूमचा कॉटन इअर बड्स बाजारात विक्रीसाठी तयार होतो. याच्या एका पॅक ची किंमत बाजारात 50 ते 80 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही कमीत कमी गुंतवणूक असून घरबसल्या चांगली कमाई करू शकतो.

नक्की वाचा:Agri Bussiness Idea: कमीत कमी खर्च करून महिन्याला कमवू शकतात बक्कळ नफा,सरकारकडून मिळते सबसिडी

English Summary: making cotton eart bads bussiness is so profitable and benificial
Published on: 24 June 2022, 12:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)