Others News

केंद्र सरकारने 10 लाख नोकऱ्यांची घोषणा केल्यानंतर आता त्यापाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील मेगा भरतीचे नियोजन सुरू केले असून राज्यातील सर्वच शासकीय विभाग मिळून जवळजवळ पावणेतीन लाख असलेल्या रिक्त जागांपैकी डिसेंबर 2022 पर्यंत जवळपास एक लाख पदांची मेगा भरती करण्याचे शासनाने नियोजन सुरू केले

Updated on 16 June, 2022 10:12 AM IST

 केंद्र सरकारने  10 लाख नोकऱ्यांची घोषणा केल्यानंतर आता त्यापाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील मेगा भरतीचे नियोजन सुरू केले असून राज्यातील सर्वच शासकीय विभाग मिळून जवळजवळ पावणेतीन लाख  असलेल्या रिक्‍त जागांपैकी डिसेंबर 2022 पर्यंत जवळपास एक लाख पदांची मेगा भरती करण्याचे शासनाने नियोजन सुरू केले

असून शासनाच्या प्रत्येक विभागाकडील मंजूर व रिक्त पदांची आरक्षण पडताळणी अंतिम करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

तसे पाहायला गेले तर मागील चार-पाच वर्षांपासून राज्य सरकार कडून कुठल्याही प्रकारची मोठी शासकीय भरती राबवली गेलेले नाही.त्यातच कोरोना महामारी मुळे आणखीनच परिस्थिती बिकट बनून ज्या लोकांच्या हातात नोकऱ्या होत्या त्या देखील चालल्या गेल्या.

त्यामुळे बरेच करून हे शासकीय पदभरतीची वाट पाहत असून  शासनाने जर लवकरच ही प्रक्रिया सुरू केली तर तरूणांना नक्कीच त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे.

नक्की वाचा:आनंदाची बातमी! 10 वी पास उमेदवारांसाठी भारतीय पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी; वाचा संपूर्ण जाहिरात

 राज्यातील विविध विभागातील रिक्त पदे आणि भरतीतील अडचणी

 राज्याच्या जवळजवळ 43 शासकीय विभागांमध्ये चालू परिस्थितीचा विचार केला तर तब्बल दोन लाख 69 हजार पदे रिक्त आहेत. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 60000 पदांच्या मेगाभरती ची घोषणा केली होती. परंतु विविध अडचणींमुळे ती होऊ शकली नाही.

त्यानंतरच्या काळात मराठा आरक्षण रद्द झाल्याने एस ई बी सी प्रवर्ग रद्द करावा लागला. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मविआ सरकारने सर्व रिक्त पदांचा तपशील मागवला असून त्याचे आरक्षण पडताळणी सुरू केली आहे.

दुसरी एक नोकर भरती सुरू करण्यामागील जमेची बाजू म्हणजे 2024 मध्ये केंद्र सरकारला पाच वर्षे पूर्ण होत असल्याने देशातील सुशिक्षित बेरोजगारांचे नाराजी दूर करण्यासाठी दहा लाख पदांची भरती करण्याची मोठी गोष्ट सरकारने केली.

नक्की वाचा:सैन्य भरती संदर्भातील अग्नीपथ योजना नेमकी काय आहे? वाचा सविस्तर

त्या पद्धतीने अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील येणाऱ्या निवडणुकांपूर्वी 200000 पदांच्या भरती चे नियोजन केले आहे.जेणेकरून सुशिक्षित बेरोजगारांचा नाराजीचा फटका निवडणुकीत बसू नये हा त्यामागील हेतू आहे.

म्हणून त्याच अनुषंगाने जुलै ते डिसेंबर 2022 या सहा महिन्यात टप्प्याटप्प्याने एक लाख पदांची भरती होईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. एवढेच नाही तर दोन ते तीन टप्प्यात सप्टेंबर 2024 पर्यंत दीड ते दोन लाख पदांची भरती होऊ शकते असेही सांगण्यात आले.

नक्की वाचा:Corona Update: कोरोनाचा धोका वाढतोय? गेल्या 24 तासात देशात 6,065 रुग्णांची नोंद, महाराष्ट्रात यापैकी निम्मे रुग्ण

English Summary: maharashtra goverment will be planing to recruitment of 1 lakh post in state
Published on: 16 June 2022, 10:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)