Others News

8th Pay Commission latest Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government employees) सध्याच्या घडीला देशभरात सातव्या वेतन आयोगासाठी कुठे शिफारसी केल्या जात आहेत. तर, कुठे काही कर्मचाऱ्यांना याचा फायदाही होताना दिसत आहे.

Updated on 11 October, 2022 9:32 AM IST

8th Pay Commission latest Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government employees) सध्याच्या घडीला देशभरात सातव्या वेतन आयोगासाठी कुठे शिफारसी केल्या जात आहेत. तर, कुठे काही कर्मचाऱ्यांना याचा फायदाही होताना दिसत आहे. काही कर्मचाऱ्यांनी (Employees) शिफारसीहून कमी पगार मिळाल्याचाही सूर आळवला आहे.

कर्मचारी संघटनांकडून सदर बाबतीत एक प्रस्ताव तयार करण्यात येत असून, तो लवकरच केंद्राकडे सोपवण्यात येणार आहे. यामध्ये शिफारसीनुसार पगारवाढ किंवा आठवा वेतन आयोग अंमलात आणण्याची मागणी करण्यात येणार आहे.

असं असलं तरीही केंद्राकडून मात्र सरकारच्या कोणत्याही सदनात यासंबंधीचा विचार करण्यास नकार देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या आशा मात्र अद्यापही माळवलेल्या नाहीत.

हेही वाचा: सरकारकडून पेन्शनधारकांना मिळाली भेट! महागाई वाढीसाठीची अधिसूचना जारी

कर्मचारी संघटनांनी अधोरेखित केल्यानुसार सध्या किमान वेतन मर्यादा 18 हजार रुपये इतकी आहे. यामध्ये फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) ला प्राधान्य देण्यात आलं आहे.

सध्या 2.57 पटींनी असणाऱ्या या फॅक्टरला सातव्या वेतन आयोगात 3.68 च्या पटीत ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. असं झाल्यास कर्मचाऱ्यांचं किमान मूळ वेतन (Salary) 18 हजारांहून 26 हजार रुपयांवर पोहोचणार आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! शिंदे गटाची नाव ठरली, वाचा काय आहेत नावं..

5th Pay Commission मध्ये किती पगारवाढ?
वेतन वृद्धी: 31%
किमान वेतनमान: 2,550 रुपये

6th Pay Commission मध्ये किती पगारवाढ? (Fitment Factor)
फिटमेंट फॅक्टर: 1.86 पट
वेतन वृद्धी: 54%
किमान वेतनमान: 7,000 रुपये

7th Pay Commission मध्ये किती पगारवाढ? (Fitment Factor)
फिटमेंट फॅक्टर: 2.57 पट
वेतन वृद्धी: 14.29%
किमान वेतनमान: 18,000 रुपये

8th Pay Commission मध्ये किती पगारवाढ? (Fitment Factor)
फिटमेंट फॅक्टर: 3.68 पटींनी संभाव्य
वेतन वृद्धी: 44.44%
न्यूनतम वेतनमान: 26000 रुपये संभव

English Summary: Lottery for Govt Employees due to 8th Pay Commission
Published on: 11 October 2022, 09:32 IST