सध्या बचत करणे फार महत्त्वाचे आहे. देशातील भक्कम आर्थिक स्थितीसाठी आजच बचत करून चांगल्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. कारण भविष्यकालीन संकटांचा अंदाज कधीच कोणाला बांधता येत नाही.
त्यामुळे आपला भविष्यकाळ सुरक्षित करायचा असेल तर बचत करून त्या बचतीची गुंतवणूक चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या परतावा देणाऱ्या योजना करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजना सध्या आहेत. परंतु आपण केलेली बचत चांगल्या ठिकाणी सुरक्षित गुंतवणूक करता यावी, हे देखील महत्वाचे असते. यासाठी आपण सुरक्षित अशा पोस्ट खात्याच्या योजनांचा विचार करू शकतो. या लेखामध्ये आपण अशाच भारतीय पोस्ट खात्याच्या एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत जी एक छोटी बचत योजना आहे.
पोस्ट खात्याची छोटी बचत योजना
किसान विकास पत्र ही पोस्ट खात्याची एक छोटी बचत योजना असून या माध्यमातून तुम्ही तुमच्या बचतीची रक्कम दुप्पट करू शकतात.
. योजना प्रमाणपत्राच्या स्वरुपात भारतीय टपाल कार्यालय द्वारे दिली जाते. ही एक फिक्स रेट सेविंग स्कीम आहे. जर तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुमची रक्कम या मध्ये दुप्पट व्हायला 140 महिने म्हणजेच दहा वर्षे चार महिने लागतात. जर या योजनेमध्ये मिळणाऱ्या व्याजाचा विचार केला तर ते 6.9 टक्के चक्रवाढ व्याज दिले जाते. तुम्ही यामध्ये कमीत कमी एक हजार रुपये गुंतवणूक करू शकतात व नंतर 100 च्या पटीत गुंतवणूक यामध्ये वाढवता येते. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कमाल मर्यादा नाही.
या योजने मध्ये कोण खाते उघडू शकते?
एखादा अल्पवयीन मुलाचे खाते उघडायचे असेल तर त्यांच्या वतीने एखादा प्रौढ व्यक्ती हे खाते उघडू शकतो. अल्पवयीन मुलाचे वय दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते खाते त्याच्या नावावर करता येते. एवढेच नाही तर एकावेळी तीन व्यक्ती जॉइंट अकाउंट उघडू शकतात.
खाते उघडण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
1- या योजनेत खाते उघडण्यासाठी सगळ्यात अगोदर लागते तुमच्या आधार कार्ड
2- तुमचा रहिवासी दाखला
3- किसान विकास पत्र चा अर्ज
4- वयाचा पुरावा
5- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.
तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किसान विकास पत्र खरेदी करू शकतात. हे प्रमाणपत्रे रोख, चेक, बी ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट द्वारे खरेदी करता येते. विशेष म्हणजे तुमचे किसान विकास पत्र खाते तुम्ही एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस च्या शाखेत ट्रान्सफर देखील करू शकतात.
तसंच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे देखील हस्तांतरित केले जाऊ शकते. यामध्ये नॉमिनी सुविधा उपलब्ध असून देशभरात कुठल्याही पोस्ट ऑफिस मधून तुम्ही हे खरेदी करू शकतात.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:ऊस उत्पादनवाढीत मेन फॅक्टर आहे गंधक; ठरेल ऊस उत्पादन वाढीतील महत्त्वाचा घटक
Published on: 25 April 2022, 09:44 IST