PUNE : पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. किडनी रॅकेट प्रकरणी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटप्रकरणी एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज केला होता. नंतर पोलिसांनी या रॅकेटप्रकरणाबाबत गुन्हा दाखल केला आहे.
रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर ग्रँड परवेज यांच्यासह जवळजवळ 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदपत्रांची पडताळणी न दिशाभूल करून किडनी बदल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कोल्हापूर मधील महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची किडनी काढण्यात आली होती. या घटनेनंतर तिने तक्रार दाखल केली. त्यामुळे आता आरोग्य विभाग कामाला लागले आहे.
मात्र संबंधित महिलेने तसेच एजंटांनी बनवून दिलेली खोटी कागदपत्रे याची सत्यता पडताळणी विभागीय प्रत्यारोपण समितीने केली नसल्याचा ठपका समितीवर करण्यात आला आहे. डॉ. तावरे हे विभागीय प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष आहेत. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधीक्षकांवर कारवाईदेखील करण्यात आली होती.
मात्र अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना निलंबित करण्यात आले. यासंबंधी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांनी आदेश काढले होते. डॉ. अजय तावरे हे विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष होते.
जेव्हा महिलेने पोलिसांत तक्रार केली तेव्हा वैद्यकीय विभागाने रुबी हॉल क्लिनिक आणि ससूनच्या सर्वोपचार अधीक्षकांवर कारवाई केली. डॉ. तावरे हे ससून रुग्णालयाचे अधीक्षक आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष होते. किडनी तस्करीप्रकरणी आरोग्य विभागाने रुबी हॉल क्लिनिकचा प्रत्यारोपण परवाना रद्द केला असून त्यापाठोपाठ वैद्यकीय शिक्षण विभागानेसुद्धा चौकशी समिती नियुक्त करत कारवाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Pm Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी येणार 2 हजार; पण 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत
Breaking : स्वाभिमानी संघटना: हमीभाव कायद्याच्या जनजागृतीचा डंका आता देशभरात वाजणार
सॉईल सोलरायझेशन! जमीन नांगरून चांगली तापू देणे पिक उत्पादन वाढीसाठी आहे महत्त्वाचे
Published on: 12 May 2022, 11:04 IST