Others News

कॅन्सरमधील डिफ्यूज लार्ज बी-सेल लिम्फोमा नामक प्रकार अत्यंत जीवघेणा आहे. याला Non-Hodgkin's Lymphoma असं देखील म्हटले जाते. NHL-DLBCL हा कॅन्सर झाल्यानंतर अगदी 100 पैकी 40 व्यक्तींनी मोठे उपचार केले तरी जवळजवळ पाच वर्षांच्या आताच आपला जीव गमावतात.

Updated on 10 May, 2022 10:28 AM IST

आपल्या दैनंदिन जीवनात आयुर्वेदाचं खूप महत्व आहे. त्यातल्या त्यात आयुर्वेदाचं वैदयकीय क्षेत्रात तर अनन्यसाधारण असं महत्व आहे. आयुर्वेद पद्धत ही प्राचीन आणि तितकीच प्रभावी अशी पद्धत आहे. मात्र काळाच्या ओघात आयुर्वेद उपचार पद्धतीचा वापर हा मर्यादित स्वरूपात केला जात आहे. लोकांमध्ये आयुर्वेदाबद्दलची जागृती असली तरी मोठ्या आणि गंभीर आजारांवर आयुर्वेदिक उपचार घेणाऱ्यांचं प्रमाण मात्र फार कमी आहे.

या पार्श्ववभूमीवर पुण्यातून एक चकित करणारी घटना समोर आली आहे. पुण्यातल्या 51 वर्षांच्या महिलेचा कॅन्सर सारखा गंभीर आजार हा केवळ आयुर्वेदिक उपचाराने पूर्णतः बरा झाला आहे. कॅन्सरमधील डिफ्यूज लार्ज बी-सेल लिम्फोमा नामक प्रकार अत्यंत जीवघेणा आहे. याला Non-Hodgkin's Lymphoma असं देखील म्हटले जाते. NHL-DLBCL हा कॅन्सर झाल्यानंतर अगदी 100 पैकी 40 व्यक्तींनी मोठे उपचार केले तरी जवळजवळ पाच वर्षांच्या आताच आपला जीव गमावतात.

एवढ्या भणयक आजारावर या 51 वर्षांच्या महिलेने मात केली आहे. जून 2018 मध्ये या महिलेला कॅन्सर झाला होता. मात्र या आजारावर कोणत्याही प्रकारचे पारंपरिक किंवा मोठे उपचार घेयचे नाहीत असं त्यांनी ठरवलं. त्यांनी पुण्यातील डॉ. योगेश बेंडाळे यांच्या रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये आयुर्वेदिक रसायन चिकित्सेने उपचार केले. आयुर्वेदातील आठ शाखांपैकी रसायन चिकित्सा ही प्रमुख शाखा आहे. या शाखेत तारुण्य टिकवणं आणि गंभीर आजारांवर उपचार करण्याची मोठी क्षमता आहे.

डॉ. बेंडाळे हे अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजी, युरोपीयन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजी, मल्टिनॅशनल असोसिएशन ऑफ सपोर्टिव्ह केअर इन कॅन्सर इ. आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य आहेत. शिवाय ते 'सेंट्रल कौन्सिल ऑफ रिसर्च इन आयुर्वेदा अँड सिद्ध'चेही ते सदस्य आहेत. त्यांच्या क्लिनिकमध्ये वर्षाला जवळपास 3500 कॅन्सर पेशंट्सवर उपचार केले जातात.

आयुर्वेदिक उपचारांचा डेटा शास्त्रीय पद्धतीने मेन्टेन केल्यास हे उपचार जगातल्या कोणत्याही पद्धतीतून पार होऊ शकतात, असा विश्वास डॉ. बेंडाळे यांनी व्यक्त केला. 'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार डॉ. बेंडाळे यांनी असं म्हटले की, 'आमच्या टीमने सुरुवातीला ट्यूमरचा आकार कमी करण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षांच्या रसायन थेरपीच्या काळात रक्ताच्या चाचण्या करून त्याच्या सुरक्षिततेची खात्री केली जात होती.

त्यात हिमॅटॉलॉजिकल आणि बायोकेमिकल निकष तपासले जात होते. उपचार किती प्रभावी ठरत आहेत हे पाहण्यासाठी Positron Emission Tomography या चाचणीवरून ते तपासलं जात होतं. ही चाचणी वेळोवेळी केली जात होती. या उपचारांदरम्यान रुग्णाच्या आयुष्याचा दर्जा देखील तपासला जात होता. यासाठी जागतिक पातळीवरील प्रश्नावलीचा वापर केला जात होता.

निदान झाल्यानंतर दीड वर्षाने जेव्हा पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली तेव्हा PET स्कॅनमध्ये लिम्फोमाचं अस्तित्व आढळलं नाही. शिवाय रुग्णाचं क्वालिटी ऑफ लाइफ म्हणजेच आयुष्याचा दर्जा देखील खूप चांगलं होता. आणि ती महिला कॅन्सर सारख्या भयानक आजारातून मुक्त झाली. आणि या आयुर्वेद पद्धतीने करण्यात आलेल्या उपचारामुळे तिच्यावर कोणताच विपरीत परिणाम झाला नाही. यातून आयुर्वेदिक थेरपीची सुरक्षितता स्पष्ट होते,' असे डॉ. बेंडाळे यांनी सांगितलं. या ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल विकसित करण्यासाठी दोन दशकांपेक्षा जास्त काळ लागला.

Weather Maharashtra: असनी चक्रीवादळ उद्या ओडिसा आणि आंध्रमध्ये दाखल होणार; महाराष्ट्रात या ठिकाणी बरसणार पावसाच्या सऱ्या 

तसेच जागतिक पातळीवर मान्यता मिळालेल्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांच्या आधारे प्रत्येक कॅन्सर पेशंटचं डॉक्युमेटेंशन करण्यात आलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये यावर व्यापक चर्चाही करण्यात आली आहे,' असंही डॉ. बेंडाळे यांनी स्पष्ट केलं. पुढे डॉ. बेंडाळे असंही म्हटले की, 'रसायन थेरपी ही पद्धत आजारकेंद्री किंवा औषधकेंद्री नसून ती एक रुग्णकेंद्री आहे.

ज्याला आयुर्वेदात धातू असं म्हटलं जात, त्या प्रत्येक धातूचं काम म्हणजे योग्य रीतीने चालवण्यास सुरुवात करणं, आणि या उद्देशाने ही रसायन थेरपी केली जाते, असंही डॉ. बेंडाळे यांनी सांगितलं. कॅन्सरच्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. आणि ती सुरळीत होण्याच्या दृष्टीने रसायनांची फॉर्म्युलेशन्स ची निवड केली. तसेच


कॅन्सर पेशंटची प्रत्येक बारीकसारीक माहिती नोंदवता येईल, तसंच उपचारांची सुरक्षितता आणि प्रभाव यांचीही नोंद जागतिक पातळीवर निश्चित करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे करता येईल अशा प्रकारचं सॉफ्टवेअर विकसित केलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे त्या माहितीचं विश्लेषण केलं. त्यामुळे कोविड-19च्या काळात टेलिमेडिसिनच्या साह्याने दूरवरच्या कॅन्सर पेशंट्सपर्यंत आम्ही पोहचवू शकलो'.


महिला रुग्णाची केस पीअर रिव्ह्यूड पब्लिकेशनसाठी पाठवण्यात आलं आहे. जेणेकरून आयुर्वेदाबाबत वैज्ञानिक समुदायामध्ये जागृती होऊ शकेल,' असं डॉ. बेंडाळे यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे क्लिनिकल केस रिपोर्ट्स या आंतरराष्ट्रीय पीअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये रुग्णावरच्या उपचारांबद्दलचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:
आगळे वेगळे; मुलीची वाजतगाजत वरात काढणारा शेतकरी
असे काय झाले असेल? अगदी काही तासांपूर्वी 54 शेळ्या आणल्या विकत अन काही कळायच्या आत दगावल्या एकामागून एक

English Summary: Kaitukaspad! Ayurveda treatment useful for cancer; Successful experiment of a doctor in Pune
Published on: 10 May 2022, 10:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)