श्रीलंका पाठोपाठ आता पाकिस्तान देखील त्याच मार्गावर वाटचाल करत असून पाकिस्तान मध्ये देखील महागाईने उच्चांक गाठला असून येथील लोकांकडे अत्यावश्यक लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी पैसे नाहीत. परंतु या सगळ्या महागाईच्या पार्श्वभूमीवर देखील सोन्याच्या मागणीत मात्र मोठी वाढ झाली असून सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे.
जे लोक बाजारावर नजर ठेवून आहेत त्या लोकांना अर्थव्यवस्था डबघाईला जाईल याची शक्यता वाटत आहे. या महत्त्वाच्या कारणास्तव गुंतवणूकदारांचा पूर्ण विश्वास फक्त आता सोन्यावर असून पाकिस्तान मध्ये सोन्याने नवा उच्चांक गाठला आहे.
जर जिओ न्यूजने दिलेल्या बातमीचा आधार घेतला तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेबाबत अनिश्चितता वाढत असून मंदीच्या काळात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोन्यात गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.
नक्की वाचा:Inflation:आता हॉस्पिटलमध्ये ही महागाईचा शिरकाव,उपचार आणि औषधे घेणे करेल खिसा रिकामा
सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर
जिओ न्यूज नुसार, पाकिस्तान मध्ये 24 कॅरेट सोने प्रति तोळा दोन हजार रुपयांनी वाढून एक लाख 48 हजार 300 पाकिस्तानी रुपयाच्या पातळीवर पोहोचले आहे.दहा ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाख 27 हजार एकशे त्रेचाळीस पाकिस्तानी रुपया वर पोहोचली आहे.
26 जुलै 2021 रोजी एक तोळा सोने म्हणजे 11 ग्रॅम सोने एक लाख 98 हजार पन्नास रुपयाच्या पातळीवर होते म्हणजे वर्षभराचा विचार केला तर पाकिस्तानमध्ये सोन्याच्या किमती तब्बल 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
20 जून रोजी सोन्याने एक लाख 47 हजार 250 रुपये प्रति तोळा किंवा एक लाख 37 हजार 243 रुपये प्रति दहा ग्रॅमचा विक्रम केला होता.
सोन्याच्या भाव वाढीमागील कारणे
बाजारातील तज्ञांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की,पाकीस्थानी रुपयातील कमकुवतपणा आणि अर्थव्यवस्थेसाठी नवीन धोके निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली असून सोन्याची मागणी वाढली आहे.
सोन्याची मागणी गुंतवणुकीसाठी वाढली असल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले असले तरी या अहवालानुसार सर्वसामान्यांकडून होणारी गर्दी कमी झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून सोने महागल्याने त्यांच्या क्रयशक्तीवर परिणाम झाला आहे.
याचा अर्थ सध्या येणारे संकट टाळण्यासाठी सोन्याची खरेदी केली जात आहे. बाजारात रुपयाची आणखी घसरण्याची भीती असून बहुतेक गुंतवणूकदार आपल्या गुंतवणूक इतर पर्याय सोडून सोन्यात गुंतवणूक करत आहेत.
Published on: 28 July 2022, 01:53 IST