Others News

भारत विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती करत असून जगातील इतर प्रगत देशांच्या रांगेत येऊन बसला आहे. असे कुठलेही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी भारतात उच्च तंत्रज्ञानाचा वापर होत नाही. आता या बाबीवर जर आपण विचार केला तर टोलवसुली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सध्याच्या काळात फास्टटॅगच्या द्वारे टोलवसुली केली जाते परंतु त्याला आता एक नवीन पर्याय लवकरच येणार असून वाहनांच्या नंबर प्लेट वरून सॅटॅलाइट वर आधारित टोल वसुलीची प्रक्रिया संपूर्ण देशात सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. यामध्ये अगदी वाहन चालत असताना सॅटेलाईट द्वारे टोल वसुली केली जाणार असून त्यासाठी फास्टटॅगची गरज भासणार नाही.

Updated on 06 August, 2022 1:39 PM IST

 भारत विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती करत असून जगातील इतर प्रगत देशांच्या रांगेत येऊन बसला आहे. असे कुठलेही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी भारतात उच्च तंत्रज्ञानाचा वापर होत नाही. आता या बाबीवर जर आपण विचार केला तर टोलवसुली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.

सध्याच्या काळात फास्टटॅगच्या द्वारे टोलवसुली केली जाते परंतु त्याला आता एक नवीन पर्याय लवकरच येणार असून वाहनांच्या नंबर प्लेट वरून सॅटॅलाइट वर आधारित टोल वसुलीची प्रक्रिया संपूर्ण देशात सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. यामध्ये अगदी वाहन चालत असताना सॅटेलाईट द्वारे टोल वसुली केली जाणार असून त्यासाठी फास्टटॅगची गरज भासणार नाही.

नक्की वाचा:सुवर्ण खरेदी करण्याची सुवर्णसंधी!सोन्याच्या दरामध्ये घसरण सुरूच, जाणून घ्या आजचे नवीन दर

याची ही माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये दिली. पुढे ते म्हणाले की, टोलवसुलीच्या संदर्भात जर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले तर त्या माध्यमातून टोल वसुलीत अधिक सुधारणा करण्यास पूर्ण संधी आहे.

या माध्यमातून कोणालाही टोल चोरता येणार नाही किंवा वाचवता येणार नाही. पुढे ते म्हणाले की, या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी वाहन उत्पादकांना वाहनांमध्ये जीपीआरएस सुविधा देण्यास सांगितले आहे. त्यामुळे टोलवसुली सुलभ होईल आणि लोकांना देखील दिलासा मिळणार आहे.

नक्की वाचा:Petrol Quality:गाडीत पेट्रोल भरण्याअगोदर वापरा 'हि'टिप्स, कळेल पेट्रोलचा दर्जा नाही होणार नुकसान

कधीपासून सुरू होणार आहे या तंत्रज्ञानाने टोलवसुली?

 याबाबत माहिती देताना मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले की, यासंदर्भातले विधेयक संसदेत आणण्याचे प्रक्रिया सुरू असून त्यानंतर सहा महिन्यात ही प्रणाली देशात लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान अमलात आल्यानंतर टोल नाका बनवण्याची गरज नाही तसेच टोल चुकवून प्रवास करणे शक्य होणार नाही. या माध्यमातून जे पळून जाण्याचा प्रयत्न करतील त्यांना शिक्षा होईल असे देखील त्यांनी सांगितले.

 या तंत्रज्ञानाचा फायदा नेमका कोणाला होईल?

बऱ्याचदा असे होते की आपण प्रवास करत असतो दहा ते पंधरा किलोमीटरचा परंतु त्याला पंच्याहत्तर किमी साठी टोल द्यावा लागतो. परंतु आता या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला तर जीपीआरएस आधारित टोल प्रक्रियेत तेथून वाहन टोलमध्ये प्रवेश करेल आणि जेव्हा बाहेर पडेल तेव्हा पर्यंतच टोल आकारला जाईल. त्यामुळे टोल खर्चदेखील बचत होईल.

नक्की वाचा:पेट्रोल डिझेलचे नवीनतम दर जाहीर! जाणून घ्या स्वस्त झाले की महाग

English Summary: in will be coming few month in india use sattalite for toll recovery
Published on: 06 August 2022, 01:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)