जर तुम्हालाही व्यवसायाच्या माध्यमातून हंगामानुसार नफा मिळवायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो. आपल्याला माहित आहेच की आता पावसाळा सुरू असून यावेळी तुम्ही पावसाळ्यात चालणारे व्यवसाय सुरू करू शकता आणि चांगली कमाई करू शकतात. छत्री आणि रेनकोट चा व्यवसाय बद्दल आपल्याला माहित आहे.
या व्यवसायाच्या माध्यमातून सर्वाधिक नफा पावसाळ्यात होतो. परंतु या व्यवसाय व्यतिरिक्त आपण या लेखात पावसाळ्यात सहजपणे करू शकता येणारे आणि आपल्या आर्थिक बजेटनुसार सुरुवात करता येण्याजोगे आणि चांगला नफा देऊ शकतील अशा व्यवसायाची माहिती घेऊ.
पावसाळ्यात करता येण्याजोगे व्यवसाय
1- वॉटरप्रूफ बॅग निर्मिती- वॉटरप्रूफ बॅगची मागणी वर्षभर बाजारात राहते. परंतु पावसाळ्यामध्ये या बॅगची सर्वाधिक मागणी वाढते. पावसापासून आपले सामान ओले होण्यापासून वाचवण्यासाठी लोकांनाही बॅग खरेदी करणे आवडते.
ऑफिसला जाणारे लोक असोत की शाळकरी मुले, कॉलेजचे विद्यार्थी असोत हे सर्व लोक वॉटरप्रूफ बॅग घेतात. जेणेकरून पावसापासून असलेले साहित्य वाचवता व्हावे हा उद्देश असतो. अशा परिस्थितीत तुम्ही हा व्यवसाय केला तर तो तुमच्यासाठी फायदेशीर व्यवसाय असेल.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नसून फक्त दुकान हे बाजाराच्या अशा ठिकाणी असले पाहिजे ज्या ठिकाणी पिशव्यांची मागणी असेल आणि लोक एकाच वेळी येतात आणि जातात.
नक्की वाचा:भारीच की! 'या' तंत्रज्ञानाचा वापर करून वाढवा भाजीपाला; कमी वेळेत मिळणार दुप्पट उत्पन्न
2- ताडपत्री व्यवसाय- पावसाळ्यात हा व्यवसाय सर्वाधिक चालतो. तुम्ही सर्वांनी अनेकदा पाहिला असेल की पावसाळ्यात लोक आपल्या घरासमोर, दुकानासमोर किंवा छतावर तंबू लावतात. जेणेकरून ते पावसापासून वाचू शकतील.
त्यामुळे जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तेव्हा प्रत्येकाला त्यांच्या संरक्षणासाठी ताडपत्री लागते. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल झाकण्यासाठी देखील ताडपत्री मोठ्या प्रमाणात लागते. त्यामुळे ताडपत्री व्यवसाय सुरू केल्यास पावसाळ्यात चांगला नफा देऊ शकतो.
3- समोसे,पकोडाचा व्यवसाय- पावसाळ्यामध्ये समस्या आणि पकोडे खायला मिळाले तर पावसाचा आनंद आणखीनच वाढतो.
समोसे खाण्याची खरी मजा पावसाळ्यात असते. त्यामुळे तुम्ही पावसाळ्यात समोसे पकोडे यांचा व्यवसाय सुरू करू शकतात. ज्या आर्थिक बजेट नुसार तुम्ही हा व्यवसाय छोट्या प्रमाणावर सुरू केला तर तुम्ही कोणत्याही चांगल्या मार्केटमध्ये दुकान उघडू शकतात.
सोबत चहादेखील बनवून विकला तर तुमचा नफा आणखी वाढतो. आपल्याला माहित आहेच की पावसाळ्यात पकोडे आणि समोस्या सोबत चहा प्यायची खरी मौज असते. या व्यवसायातून तुम्ही पंधरा ते वीस हजार रुपये दरमहा सहज कमवू शकतात.
नक्की वाचा:Bussiness Idea:हटके स्टाइलने करा 'हा' व्यवसाय, दैनंदिन होईल चांगली कमाई आणि मिळेल नफा
Published on: 28 July 2022, 11:07 IST