Others News

सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. इतर कागदपत्रांपैकी आधार कार्डला सध्या जास्त महत्व आहे. ग्राहकांना अनेक सेवांचा लाभ घेयचा असेल तर आधार कार्ड अनिवार्य असतेच. महत्वाचे म्हणजे आधारशिवाय सरकारी योजनांचा तसेच बँकिंग सेवांचा लाभ घेणं देखील कठीण होऊन जाते.

Updated on 25 September, 2022 3:21 PM IST

सध्याच्या काळात आधार कार्ड (Aadhaar card) खूप महत्वाचे आहे. इतर कागदपत्रांपैकी आधार कार्डला सध्या जास्त महत्व आहे. ग्राहकांना अनेक सेवांचा लाभ घेयचा असेल तर आधार कार्ड अनिवार्य असतेच. महत्वाचे म्हणजे आधारशिवाय सरकारी योजनांचा तसेच बँकिंग सेवांचा लाभ घेणं देखील कठीण होऊन जाते.

विशेष म्हणजे आधारशी संबंधित सेवा लोकांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी UIDAI देशातील प्रत्येक भागात आपली केंद्रे उघडत आहे. UIDAI ची ही मोठी योजना आहे. UIDAI ने देशातील 53 प्रमुख शहरांमध्ये एकूण 114 आधार सेवा केंद्रे उघडण्याची योजना तयार केली आहे.

माहितीनुसार सर्व मेट्रो शहरं, सर्व राज्यांच्या राजधानी आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही आधार सेवा (Aadhaar service) केंद्रे उघडली जाणार आहेत. सध्या देशात कार्यरत आधार सेवा केंद्र एकूण संख्या 88 आहे. ही संख्या सध्या वाढवण्याची तयारी केली जात आहे.

कौतुकास्पद! तब्बल 250 एकरवर गवती चहाची लागवड; 80 शेतकरी घेत आहेत लाखों रुपयांमध्ये उत्पन्न

महत्वाचे म्हणजे आधारशी संबंधित कामांसाठी सेवा केंद्रांव्यतिरिक्त देशभरात 35,000 हून अधिक आधार केंद्रे चालू आहेत. आणि ही केंद्रे बँका, पोस्ट ऑफिस आणि राज्य आणि सरकारद्वारे चालविली जात आहेत.

आधार सेवा केंद्रांद्वारे तुम्ही बायोमेट्रिकशी (Biometric) संबंधित काम सहजपणे करू शकता किंवा आधारमध्ये नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी तुम्ही अपडेट करू शकता. या व्यतिरिक्त ज्या काही तक्रार आहेत त्या सुद्धा तुम्ही दाखल करू शकता.

उडीद उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन! उडीदाला मिळतोय 10 हजारांवर बाजारभाव

आधार नोंदणी

बायोमेट्रिक अपडेट - 100 रुपये
नाव, पत्ता, जन्मतारीख - 50 रुपये
मुलांचे बायोमेट्रिक - मोफत
तुमची काही तक्रार असल्यास तीसुद्धा दाखल करू शकता.

तुम्ही आधार संबंधित अपडेटसाठी गेलात आणि तुम्हाला यापेक्षा जास्त चार्जेसची मागणी करत असतील तर सरळ सरळ फसवणूक करत आहेत समुजन जा. याची तुम्ही तक्रारही करू शकता. अशा परिस्थितीत तक्रार करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. तुम्ही तक्रार uidai.gov.in वर मेलद्वारे किंवा टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल सुद्धा करू शकता.

महत्वाच्या बातम्या 
ग्रामीण डाक जीवन विमा योजनेत जमा करा फक्त 95 रुपये; 14 लाख रुपयांचा होईल फायदा
तुमच्या चालण्यावरून तुमचे तारुण्य ठरत असते; अशाप्रकारे चाललात तर तारुण्य राहील कायम
दिलासादायक बातमी! सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांत जमा होणार पीएम किसान योजनेचे पैसे

English Summary: Important works related Aadhaar card railway station UIDAI decision
Published on: 25 September 2022, 03:17 IST