Others News

सध्याच्या पेट्रोलच्या किमती पाहून अनेकजण इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीकडे वळत असताना पाहायला मिळत आहेत. अनेक कंपन्या ग्राहकांसाठी नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करत आहेत. आता आणखी एक सर्वसामान्यांना परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे.

Updated on 28 October, 2022 3:31 PM IST

सध्याच्या पेट्रोलच्या किमती पाहून अनेकजण इलेक्ट्रिक स्कूटर (Electric scooter) खरेदीकडे वळत असताना पाहायला मिळत आहेत. अनेक कंपन्या ग्राहकांसाठी नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करत आहेत. आता आणखी एक सर्वसामान्यांना परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्पर्धेत आता इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप कंपनी बाज (BAAZ Bike) बाइक्सनेही प्रवेश केला आहे. कंपनीने त्यांची नवीन इलेक्ट्रिक (Electric Bike) स्कूटर Baz लॉन्च केली आहे. महत्वाचे म्हणजे या गाडीची किंमत अवघी ३५ हजार रुपये असेल असे कंपनीचे म्हणणे आहे.

सोयाबीनच्या दरात सुधारणा; किती मिळतोय बाजारभाव? जाणून घ्या

विशेष म्हणजे या स्कूटरमध्ये बॅटरी स्वॅपिंगची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे गाडीतील बॅटरी संपल्यानंतर तुम्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशनवरून बॅटरी बदलून नॉन स्टॉप गाडी चालवण्याचा आनंद लूटू शकणार आहात. या गाडीचा टॉप स्पीड 25 किमी/तास आहे. त्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सचीही गरज भासणार नाही. बाज ई-स्कूटरची रचना आणि विकास आयआयटी-दिल्ली आधारित ईव्ही स्टार्ट-अपने केली आहे.

ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक; वेळीच अशापद्धतीने घ्या काळजी

90 सेकंदात बदलली जाणार बॅटरी

Baz इलेक्ट्रिक स्कूटर खास डिलिव्हरीसाठी तयार करण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, याची बॅटरी (Electric Battery) अवघ्या 90 सेकंदात बदलली जाऊ शकते. त्यामुळे जे लोक एका दिवसात 100 किमी पेक्षा जास्त प्रवास करतात त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

टॉप स्पीड 25km/h

Baaz इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीला अॅल्युमिनियमच्या आवरणात लिथियम-आयन सेल्ससह सुसज्ज पॉड्स देण्यात आले आहेत. यात बसवण्यात आलेल्या बॅटरीचे वजन 8.2 किलो आहे. या गाडीमध्ये आग, पूर किंवा तत्सम परिस्थिती आढळून आल्यास रायडरला अलर्ट करते.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांसाठी सागवानची शेती ठरेल फायदेशीर; काही वर्षातच शेतकरी होतील करोडपती
सरकारची खास योजना! 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर पाच वर्षांत मिळणार 2 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी
शेतकऱ्यांनो पीक कापणीसाठी या ब्रश कटरचा करा वापर; कमी वेळेत मिळेल चांगला नफा

English Summary: Important news general public Electric scooter launch 35 thousand Features
Published on: 28 October 2022, 03:18 IST