शेती(agriculture) हा आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय आहे. अंदाजे देशातील सुमारे 90 टक्के लोक ही शेती व्यवसाय करतात. शेती करताना शेतकऱ्याला प्रचंड कठीण समस्यांना तोंड द्यावं लागतं. उदा. पाऊस, वादळ, किड्याचे पिकावरील आक्रमण इत्यादि.या नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्यांना आपली पिके गमवावी लागतात म्हणजेच या पिकांची पूर्णपणे नासाडी होते.
पीक विमा योजनेचा लाभ:
नासाडी झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाई साठी शासन आपल्याला शेती क्षेत्रानुसार काही रक्कम ठरवून देते थोडक्यात आपण त्याला पीक विमा सुद्धा म्हणतो.पंतप्रधान पीक विमा योजना ही आपल्या देशात 2016 या सालासुन आमलात आणली गेली आहे. सुरवातीस ज्या शेतकऱ्यांवर कर्ज असे त्या शेतकऱ्यांना या पीक विमा योजनेचा लाभ घेता येत नसे. त्यानंतर नियमात बदल करून सरकारने कर्जदार आणि बिगरकर्जदार याना सुद्धा पीक विमा योजनेत शामिल करून घेतले.
हेही वाचा:अन्नद्रव्यांचे प्रकार व त्यांचे महत्त्व
पीक विम्याचा फॉर्म भरल्यावर तो कोठेपर्यंत मंजूर झाला त्याची माहिती कशी पहावी त्यासाठी आपण माहिती बघणार आहोत.
विम्यासंबंधीत सर्व प्रकारची तक्रार येथे करावी:-
पिकाचे नुकसान झाल्यावर 72 तासांच्या आत शेतकऱ्याने पूर्वसूचना घ्यावी.- त्यानंतर आपल्या मोबाइल मध्ये crop insurance app हे डाउनलोड करून घ्यावे. तसेच विमा कंपन्या च्या टोल फ्री नंबर वरून ही पूर्वसूचना द्यावी.
- परंतु काही वेळेस विमा कंपन्यांचा फोन इंगेज येतो तेव्हा आपण तहसील ला जाताना मूळ फॉर्म सही व शिक्क्या सोबत न्यावा. त्यानंतर त्यावर प्रक्रिया होण्यास सुरुवात होते.
जर का आपण पीक विमा काढला असल्यास त्याचे स्टेटस सुद्धा आपल्याला बघता येते:
- त्यासाठी पहिल्यांदा पंतप्रधान विमा योजनेच्या अंतर्गत PMFBY या वेबसाईटवर जाऊन अँप्लिकेशन स्टेटस वर जावे.
- अँप्लिकेशन स्टेटस वर क्लिक केल्यानंतर तिथं आपल्याला आपल्या फॉर्म वरील नंबर टाकावा लागणार आहे. नंबर टाकल्यावर त्याच्या खाली कॅपचा टाकून चेक स्टेटस यावर क्लिक करावे.
- त्यावर क्लिक केल्यावर आपल्या समोर पीक योजनेची आपली सर्व माहिती आपल्या समोर दिसेल. अश्या प्रकारे घरबसल्या आपण पीक विम्याची माहिती आणि तक्रार देऊ शकतो.
Published on: 14 June 2021, 09:13 IST