आपल्याला माहित आहे की नुकतेच आरटीआर भरण्याची मुदत संपली. यामध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे नियम आहेत. त्यामध्ये आपण यात महत्त्वाचा विषय समजून घेऊ म्हणजे समजा तुम्ही शेत जमीन विकली असेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला नफा झाला असेल तर याची माहिती आयटीआर अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये द्यावी की नाही हा प्रश्न सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.
कारण आपला भारत देश हा कृषिप्रधान आहे आणि देशांमध्ये जमिनीचे खरेदी-विक्री एक सामान्य गोष्ट आहे. यासाठी इन्कम टॅक्सचे काय नियम आहेत हेदेखील माहिती असणे गरजेचे आहे. याची माहिती घेऊ.
आयटीआर विषयी नियम
यामध्ये सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातील ज्या काही शेतजमिनी आहेत, या जमिनींना भांडवली मालमत्तेचा दर्जा नाही.
त्यामुळे तुम्ही अशी जमीन विकली तरी त्या माध्यमातून तुम्हाला मिळालेला नफा हा भांडवली नफ्यामध्ये समाविष्ट होत नाही. परंतु यामध्ये देखील काही नियम आहेत. त्यांची तुम्ही काळजी घेणे फार आवश्यक असून यासंबंधीचे काळजी घेतली तर जमीन विक्रीतून मिळालेल्या नफ्यातून करमाफीचा दावा करता येऊ शकतो.
काही प्रकरणांमध्ये, शेतजमिनीच्या विक्रीवर जो काही नफा होतो, त्या नफ्याला कलम 54 बी अंतर्गत पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. म्हणजेच संबंधित कराचा लाभ जमीन मालकाला भांडवली नफ्यात न ठेवता दिला जाईल.
करात सूट मिळण्यासंबंधीच्या अटी
यासंबंधी काही अटी असून त्यापैकी एक महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागात विकलेल्या जमिनीचा नफा भांडवली नफ्यात नोंदवला जात नाही.परंतु शहरी शेती च्या जमिनीबाबत असे होत नाही. शहरांमध्ये कोणतीही शेतजमीन असेल
आणि ती विकून नफा मिळत असेल तर भांडवली नफ्यात येतो. परंतु त्यासाठी शहरी जमिनीवर शेतकरी किंवा जमीन मालकाला काही नुकसान भरपाई मिळाल्यास कलम 10(37) अंतर्गत करात सूट मिळते.
नक्की वाचा:अपडेट पीएफ विषयी: ईपीएफओ संबंधित 'हे' काम करा नाहीतर अडकतील पैसे,जाणून घ्या प्रक्रिया
कलम 54 बी अंतर्गत ग्रामीण शेत जमिनीवरील कर सवलतीचा लाभ कसा घ्यावा?
या माध्यमातून तुम्हाला शेत जमीन विकण्याचा कर नियम आणि त्याचा वापर कसा करायचा हे कळायला मदत होईल.
1- ही सुट एखाद्या व्यक्तीला किंवा एचयुएफला दिली जाते.
2- ज्या तारखेला तुम्ही जमीन विकली त्या तारखेपासून दोन वर्षापूर्वी जमीन लागवडीसाठी वापरली जाणे आवश्यक आहे.
3- शेतजमीन घेतल्यानंतर दोन वर्षाच्या आत त्या पैशातून नवीन शेतजमीन खरेदी करावी लागली तर भांडवली नफा करात सूट मिळते.
4- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमची जमीन ग्रामीण भागात येत असेल आणि तुम्ही सर्व करनियमांचे पालन करून खरेदी विक्री करत असाल, तर ती भांडवली मालमत्ता म्हणून गणली जात नाही. त्यामुळे अशा जमिनीच्या विक्री किंवा हस्तांतरण यावर कोणत्याही प्रकारचा कर लागत नाही.
नक्की वाचा:Market Situation:येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर उतरतील?कारण की….
Published on: 02 August 2022, 03:52 IST