Others News

भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्याच्या इलेक्ट्रिक कार आहेत. अनेक नवीन इलेक्ट्रिक कार लाँचिंगसाठी प्रयत्न करत आहेत. Hyundai ने देखील आपली इलेक्ट्रिक कार बाजारात आणली आहे.

Updated on 16 February, 2022 3:15 PM IST

भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्याच्या इलेक्ट्रिक कार आहेत. अनेक नवीन इलेक्ट्रिक कार लाँचिंगसाठी प्रयत्न करत आहेत. Hyundai ने देखील आपली इलेक्ट्रिक कार बाजारात आणली आहे. Hyundai ची नवीन इलेक्ट्रिक कार ह्युंडई आयनिक 5 (Hyundai Ioniq 5) भारतात सादर करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंट कार आहे.

Hyundai Ioniq 5 Car Design

डिझाइनच्या बाबतीत Ioniq 5 EV ही कार अधिक आकर्षक आहे. कारचा अंतर्गत भागही आकर्षक आहे. मुव्हेबल सेंटर कन्सोल, फ्लॅट फ्लोअर, इलेक्ट्रॉनिकली ईको-बेस्ड मटेरिअल डिझाइनचा वापर करण्यात आला आहे. त्याशिवाय, 12 इंचाचा टचस्क्रिन आणि चालकासाठी 12 इंचाचा डिस्प्लेही देण्यात आला आहे.

चौकोनी आकाराचे टेल-लॅम्प, समोरील बंपरवरील अथवा चाकांवरील कट्समुळे कार आकर्षक दिसत आहे. Ioniq 5 EV या कारमधील आतील भाग अधिक प्रशस्त असल्याचे दिसून येते.

Ioniq 5 मध्ये 77.4kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय, यामध्ये 72.6 kWh बॅटरी पर्यायदेखील उपलब्ध आहे. मजबूत बॅटरी बॅकअपमुळे ही कार 500 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते, जी Kona EV पेक्षा 20 टक्क्यांनी अधिक आहे.

यापूर्वी Kona EV ही ह्युंदायची सर्वात जास्त रेंज देणारी कार होती. Ioniq 5 च्या केबिनमध्ये डॅशबोर्ड, स्विच, स्टीयरिंग व्हील आणि डोर पॅनल पॉलीयूरीथेन बायो पेंटने पेंट केलं आहे. ही कार लांब व्हीलबेस आणि फ्लॅट फ्लोरला सपोर्ट करते.

English Summary: Hyundai Electric Car
Published on: 16 February 2022, 03:15 IST