Others News

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. सध्या शेतीमध्ये पारंपारिक अवजारांचा वापर कमी होऊन यांत्रिकीकरण वाढत आहे. शेतीमधील मशागतीची कामे करण्यासाठी हवे तेवढे मनुष्यबळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर अवजारांचा वापर करणे गरजेचे बनत आहे.

Updated on 16 March, 2021 4:44 PM IST

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. सध्या शेतीमध्ये पारंपारिक अवजारांचा वापर कमी होऊन यांत्रिकीकरण वाढत आहे. शेतीमधील मशागतीची कामे करण्यासाठी हवे तेवढे मनुष्यबळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर अवजारांचा वापर करणे गरजेचे बनत आहे.

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान उपलब्ध करुन देत आहे.शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटवर अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाणार असून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, महिला शेतकरी यांना 1 लाख ते 1.25 लाख तर इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75 हजार आणि 1 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य केले जाते, याविषयीचे वृत्त टीव्ही ९  ने दिले आहे.

योजनेचा उद्देश

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजनेअतंर्गत जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे, अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. हा उद्देश आहे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे. कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे सहभागीदारांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे, हा उद्देश आहे.

हेही वाचा : ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर एकदा चार्ज केल्यानंतर करेल ८ तास काम अन् धावेल २४ किमी प्रति तास

कोणते शेतकरी ट्रॅक्टरसाठी अर्ज करु शकतात ?

शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ चा उतारा असावा. शेतकरी अनुसूचित. जाती , अनुसूचित जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर अनुदानाता लाभ घेतल्यास पुढील 10 वर्ष अर्ज करता येणार नाही. मात्र, इतर औजारासाठी अर्ज करता येईल.

 

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

७/१२ उतारा

८ अ दाखला

खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल

जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )

स्वयं घोषणापत्र

पूर्वसंमती पत्र

 

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी शेतकरी योजनावर क्लिक करावे. पुढे कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजना निवडावी. महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी पहिल्यांदा नोंदणी करण्यासाठी नवीन वापरकर्ता नोंदणीवर क्लिक करा. पुढे शेतकऱ्यांनी त्यांचं नाव टाकावे, युजर नेम आणि पासवर्ड टाकून महाडीबीटीवर लॉगीन तयार करा त्यासाठी शेतकऱ्याकडे ईमेल आयडी असणं बंधनकारक असून त्यांचं आणि मोबाईल नंबंरचं व्हेरिफिकेशन करावं लागते. लॉगीन करुन अर्ज भरावा लागेल. लॉगीन केल्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकून आधार प्रमाणीकरण करुन घ्या. शेतकऱ्यांनी वैयक्तिक माहिती, शेती जमिनीची माहिती भरा.

हेही वाचा :  अनुभवाच्या जोरावर बनवला कमी किंमतीचा बुलेट ट्रॅक्टर; इतर राज्यातही ठरतोय हिट

लॉगीन केल्यानंतर शेतकऱ्यांनी पुढील माहिती भरुन एकाच अर्जाद्वारे विविध योजनांचा लाभ घेता येतो. त्यापैकी कृषी यांत्रिकीकरण पर्याय निवडून पुढे जावे. शेतकऱ्यांनी कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्जसहाय्य हा पर्याय निवडावा. त्यानतर ट्रॅक्टर हा पर्याय निवडावा. पुढे जाऊन 2 डब्ल्यू डी किंवा 4 डब्ल्यू डी पैकी योग्य पर्याय निवडावा. ट्रॅक्टरची एचपी श्रेणी निवडावी. सर्व माहिती भरुन अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करावे.अर्ज सादर केल्यानंतर प्राधान्य क्रमांक निवडावा.त्यानंतर अर्जाची फी भरावी. यासाठी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागतात.

 

महाडीबीटी पोर्टलवरुन विविध शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक शेतकरी-एक अर्ज या पद्धतीद्वारे एकचं अर्ज करणं अपेक्षित आहे. त्यामुळे दुसरा अर्ज करता येणार नाही. परंतु पहिला अर्ज रद्द करुन पसंतीच्या सर्व बाबींसाठी पुन्हा नव्यानं एकच अर्ज करता येईल. त्यासाठी पहिला अर्ज रद्द करावा लागेल.

 

English Summary: How to apply for financial assistance of Rs. 1 to 1.25 lakhs from Agricultural Mechanization Sub-campaign for tractors to farmer
Published on: 16 March 2021, 04:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)