Others News

शेतीसंबंधी जमिनीचा नकाशा हा फार महत्त्वाचा असतो. स्वतःच्या शेताचा रस्ता किंवा आपल्या शेतात ची हद्द जाणून घ्यायचे असतील तर तुमच्याकडे जमिनीचा नकाशा असणे आवश्यक असतं. आता जमिनी विषयक महत्वाच्या असलेल्या सातबारा आणि 8 अ उतारा सोबतच जमिनीचा नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे. तर मग जाणून घेऊया जमिनीचा ऑनलाइन नकाशा कसा पहावा?

Updated on 08 September, 2021 12:00 PM IST

शेतीसंबंधी जमिनीचा नकाशा हा फार महत्त्वाचा असतो. स्वतःच्या शेताचा रस्ता किंवा आपल्या शेतात ची हद्द जाणून घ्यायचे असतील तर तुमच्याकडे जमिनीचा नकाशा असणे आवश्यक असतं. आता जमिनी विषयक महत्वाच्या असलेल्या सातबारा आणि 8 अ उतारा सोबतच जमिनीचा नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे. तर मग जाणून घेऊया जमिनीचा ऑनलाइन नकाशा कसा पहावा?

जमिनीचा ऑनलाइन नकाशा कसा पहावा:

  1. जमिनीचा नकाशा ऑनलाइन पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगल वर mahabhumi.gov. in सर्च करावे.
  2. सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होते.
  3. या ओपन झालेल्या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला लोकेशन हा पर्याय दिसतो. या पर्यायात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरीमध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रूरल हा पर्याय निवडावा आणि शहरी भागात राहत असाल तर अर्बन हा पर्याय निवडायचा असतो.
  4. त्यानंतर तुमचा जिल्हा, तुमचा असलेला तालुका आणि तुमच्या गाव निवडल्यावर सगळ्यात शेवटी व्हिलेज मॅप वर क्लिक करावे.

या व्हिलेज मॅप वर क्लिक केल्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो. हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये पाहण्यासाठी तुम्ही होम या पर्याय समोरील आडव्या बाणावर क्लीक करावे. त्यानंतर डावीकडे असलेल्या + किंवा - या बटणावर क्लिक करून उपलब्ध नकाशा तुम्ही मोठ्या छोट्या आकारात पाहू शकता.

जमिनीचा नकाशा कसा काढावा?

या पेज वर सर्च बाय प्लॉट नंबर या नावाने एक रखना दिलेला असतो. तिथे तुमच्या सातबारा उताऱ्यावर असलेला गट क्रमांक टाकायचा असतो त्यानंतर तुमच्या जमिनीचा नकाशा उपलब्ध होतो. डावीकडे असलेल्या प्लॉट इन्फो तेरा कानाखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेत जमीन कोणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती दिलेली असते.

 

एका गट क्रमांक आ मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्याची सविस्तर माहिती दिलेली असते.

हेही वाचा :मोबाईलच्या एका क्लिकने मोजा आपली शेत जमीन

 

 

ही माहिती पाहून झाल्यानंतर डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी मॅप रिपोर्ट नावाचा पर्याय असतो. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्‍या जमिनीचा प्लॉट रिपोर्ट तुमच्यासमोर ओपन होतो. त्या वरच्या बाजूकडील खाली दिशा असलेल्या बाणावर क्लिक केले की मी डाऊनलोड करू शकता.

 

English Summary: how see online land map process
Published on: 08 September 2021, 12:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)