Others News

आज सूर्योदयाच्या वेळी चंद्र उत्तराभाद्रपद नक्षत्रात आणि मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. तर, सूर्य कन्या राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. तर, वृषभ राशीच्या लोकांना वादांपासून दूर राहावे लागणार आहे. वाचा संपूर्ण राशीभविष्य…

Updated on 04 October, 2022 5:49 PM IST

आज सूर्योदयाच्या वेळी चंद्र उत्तराभाद्रपद नक्षत्रात आणि मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. तर, सूर्य कन्या राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना व्यवसायात (buisness) नफा मिळण्याची शक्यता आहे. तर, वृषभ राशीच्या लोकांना वादांपासून दूर राहावे लागणार आहे. वाचा संपूर्ण राशीभविष्य…

मेष

आज भागीदारीच्या कोणत्याही व्यवसायात नफा मिळू शकतो, त्यामुळे तुम्ही भागीदारीत कोणतेही काम करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मित्राच्या मदतीने आज तुमचे कोणतेही रखडलेले काम पूर्ण होऊ शकते.

वृषभ

आरोग्यही बिघडू शकते. मनात थोडी चिंता असू शकते. इतरांशी संवाद (communication) साधताना विशेष काळजी घ्या. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. नोकरदार लोकांना टार्गेट पूर्ण करण्यात काही अडचणी येऊ शकतात.

मिथुन

मनात भावनांचे चढ-उतार असतील. नोकरीसाठी दिलेली मुलाखत यशस्वी होईल. शासनाकडूनही सहकार्य मिळेल. कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात अधिक धावपळ होईल. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल.

कर्क

कामात चुका होऊ देऊ नका. व्यापाऱ्यांना विक्रीनुसार मालाचा साठा करणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल. तरुणाईसाठीही दिवस चांगला जाईल. कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल, एखाद्याची प्रकृती बिघडू शकते.

सिंह

महिलांसाठी आजचा दिवस विशेषतः आरामदायी असेल. नवीन योजना आखल्या जातील, ज्या फायदेशीर ठरतील. तुमची बोलण्याची शैली इतर लोकांना आकर्षित करेल. जास्त कामामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नकारात्मकता ओढवू देऊ नका; वर्तमानात जगायला शिका. कोणतेही काम घाई न करता पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव कायम राहील.

शेतकऱ्यांनो जनावरांच्या आरोग्यात लोहाचा समावेश करा; उत्पादनात होईल वाढ

कन्या

मनात चिंता असल्याने कामात रस वाटणार नाही. धनहानी होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. कामात यश न मिळाल्याने निराशा होऊ शकते. मुलांची चिंता राहील. नियोजित प्रवास पुढे ढकला. दुपारनंतरही हीच स्थिती राहणार आहे. संयमाने वागा. शक्य असल्यास, शांत रहा आणि आराम करा.

तूळ

गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. कामाच्या ठिकाणी लोक तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. एखाद्या कायदेशीर प्रकरणातील वादामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल, परंतु तुमची ही समस्या अनुभवी व्यक्तींच्या मदतीने सोडवली जाईल.

वृश्चिक

काही लोक आज घाईघाईत आपल्या जोडीदाराला असे वचन देऊ शकतात, जे पूर्ण करण्यात त्यांना त्रास होईल. निश्चित उत्पन्नामुळे तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा तुम्हाला नंतर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.

धनु

जर काही गोष्टींमध्ये बदल करण्याची योजना असेल, तर ही वेळ योग्य आहे. मित्रासोबत प्रवासाची योजना आखाल. काही जुन्या आठवणीही ताज्या होतील. इतरांच्या कामात ढवळाढवळ न करणे तुमच्यासाठी चांगले राहील. जवळच्या व्यक्तीशी वाद घालणे देखील घराच्या व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करेल.

सावधान! ही लक्षणे जाणवल्यास समजा तुमच्या फुप्फुसात पाणी भरलंय; जाणून घ्या सविस्तर

मकर

तुमच्या नकारात्मक विचारांचा थेट परिणाम कामावर होईल. नोकरदार लोकांना टार्गेट पूर्ण करण्यात काही अडचण येऊ शकते. वाणीवर संयम ठेवा. अपघाताची भीती राहील. दुपारनंतर तब्येत सुधारेल. मनात आनंद राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

कुंभ

तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादी भेटवस्तूही आणू शकता. कुटुंबातील आनंददायी वातावरणामुळे तुम्ही आनंदी राहाल आणि तुमचा तणावही थोडा कमी होईल. एखाद्याची थट्टा मस्करी करणे टाळा. अन्यथा त्याचे वादात रुपांतर होईल.

मीन

व्यवसायात (buisness) योग्य नियोजन केल्यास व्यवसाय वाढू शकेल. अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यवसायाशी संबंधित प्रवासाचे योग आहेत. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळू शकतो. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नोकरदारांना सहकाऱ्यांची मदत मिळेल. जोडीदाराशी तुमचे नाते घट्ट होईल.

महत्वाच्या बातम्या;
मोठी वेलची शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार; शेतकरी होणार मालामाल
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! बाजारात बाजरीची किंमत वाढली; विकली जातेय 'या' दराने
पोस्टाच्या सेव्हिंग स्किममधील गुंतवणूकदारांसाठी खुशखबर; सरकार देणार दसऱ्याची मोठी भेट, होणार फायदाच फायदा

English Summary: Happy day Aries Leo Libra Know complete horoscope
Published on: 04 October 2022, 05:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)