Others News

गुंतवणुकीच्या बाबतीत पोस्ट ऑफिसच्या देखील विविध प्रकारच्या अशा उत्तम गुंतवणूक योजना आहेत. आपण बऱ्याच योजनांची माहिती विविध लेखांच्या माध्यमातून घेतली आहे. आज या लेखात देखील आपण अशाच उपयुक्त पोस्ट खात्याच्या एका गुंतवणुक योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. जी आवाक्यात असणाऱ्या गुंतवणुकीतून चांगल्या प्रकारे परतावा देते.

Updated on 09 September, 2022 6:15 PM IST

गुंतवणुकीच्या बाबतीत पोस्ट ऑफिसच्या देखील विविध प्रकारच्या अशा उत्तम गुंतवणूक योजना आहेत. आपण बऱ्याच योजनांची माहिती विविध लेखांच्या माध्यमातून घेतली आहे. आज या लेखात देखील आपण अशाच उपयुक्त पोस्ट खात्याच्या एका गुंतवणुक योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. जी आवाक्यात असणाऱ्या गुंतवणुकीतून चांगल्या प्रकारे परतावा देते.

नक्की वाचा:LIC Poicy: प्लॅनच्या कालावधीपेक्षा कमी पैसे भरून देखील लखपती होण्याची संधी देते 'ही' योजना, वाचा सविस्तर

 पोस्ट खात्याची ग्रामसुरक्षा योजना

 पोस्ट खात्याची योजना एक जीवन विमा पॉलिसी असून या योजनेच्या माध्यमातून पॉलिसी घेतल्यानंतर पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर एंडोमेंट ॲशुरन्स पॉलिसी मध्ये रुपांतरीत करण्याचे वैशिष्ट्य आहे. या माध्यमातून पॉलिसी घेणाऱ्यास वयाच्या 55, 58 किंवा साठ वर्षे वयापर्यंत प्रिमियम भरून जास्तीत जास्त लाभ मिळवता येऊ शकतो.

 या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये

1- 19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील कोणतेही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकते.

2- या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी विम्याची रक्कम ही दहा हजार रुपये असून जास्तीत जास्त दहा लाख रुपये आहे.

3- या योजनेत तुम्ही प्रतिमाह, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकतात.

नक्की वाचा:LIC Scheme: सरकारच्या 'या' योजनेत फक्त 240 रुपये गुंतवा; मिळणार 50 लाखांचा नफा

4- योजना सुरू झाल्यानंतर चार वर्षे पूर्ण झाले की तुम्हाला या योजनेवर कर्ज देखील घेता येऊ शकते.

5- तीन वर्ष पूर्ण झाले तर पॉलिसीधारक पॉलिसी सरेंडर करू शकतात. परंतु पॉलिसी सरेंडर केल्यास योजनेत मिळणारा बोनसचा फायदा मिळत नाही. यामध्ये शेवटचा जाहीर केलेला बोनस 60 रुपये प्रति एक हजार रुपये विम्याची रक्कम वार्षिक आधारावर आहे.

 या योजनेत दररोज पन्नास रुपये जमा केले तरी मिळतील 35 लाख रुपये

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत पॉलिसीधारकाला फक्त पन्नास रुपयांच्या रोजचा ठेवीवर 35 लाख रुपयांचा परतावा मिळणे शक्य आहे.

दररोज पन्नास रुपये या हिशोबाने जर प्रति महिन्याला 1515 रुपये जमा केले तर आणि पॉलिसी दहा लाख रुपयांची असेल तर त्याला मॅच्युरिटी वर 34 लाख 60 हजार रुपये मिळतात. 55 वर्षाच्या मॅच्युरिटी वर 31 लाख 60 हजार रुपये, 58 वर्षाच्या मॅच्युरिटी वर 33 लाख 40 हजार रुपये, साठ वर्षाच्या मॅच्युरिटी वर 34 लाख 60 हजार रूपये मिळतात.

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी उद्योजक बनण्याची मोठी संधी; 35% अनुदानावर घरबसल्या सुरू करा 'हे' व्यवसाय

English Summary: gram suraksha scheme is the so benificial investment scheme of post office
Published on: 09 September 2022, 06:15 IST