महाराष्ट्र सरकारने एक कर्मचार्यांसाठी चांगली बातमी दिली असून कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आले असून या अगोदर कर्मचाऱ्यांना दोन हप्त्यामध्ये वेतन दिले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये अरीयरचे पैसे जमा झाले असून कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आपल्याला माहित आहेच की केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात जवळ जवळ चार टक्क्यांची वाढ केली असून अनेक राज्यांनी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता देखील वाढ केली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी दिली असून कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते आले आहेत. परंतु आता तिसरा हप्ता देखील खात्यावर पाठवत आहे.
महाराष्ट्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून थकबाकीचा तिसरा हप्ता देण्याची घोषणा आधीच केली होती परंतु मध्यंतरी जो काही सत्तासंघर्ष घडला त्यामुळे डॉक्युमेंटेशन अपूर्ण राहिल्याने त्याला वेळ लागला
परंतु आता जुलै ते ऑगस्ट महिन्यात हा थकबाकीचा तिसरा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यावर येत असून सरकारने हा तिसरा हप्ता जारी केला असून पैसे जमा होऊ लागले आहेत.
नक्की वाचा:7th Pay Commission: DA वाढविण्याबाबत सरकारकडून मोठी अपडेट; जाणून घ्या
सरकारच्या या निर्णयाचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार असून ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसे आल्याने कर्मचाऱ्यांना एक आर्थिक समाधान लाभणार आहे.
यामध्ये गट अधिकाऱ्यांना 30 ते 40 हजार रुपयांचा फायदा होणार असून गट-ब अधिकार्यांना वीस ते तीस हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे व जे कर्मचारी गट क श्रेणीतील आहेत अशा कर्मचाऱ्यांना 10 ते 15 हजार रुपये आणि चौथ्या श्रेणीतील लोकांना आठ ते दहा हजार रुपयांचा फायदा मिळणार आहे.
Published on: 12 August 2022, 11:50 IST