अनेकदा आपण सर्वांशी चांगले वागतो, अनेकदा मदत करतो, आर्थिक मदत देखील करतो, मात्र आपल्याशी समोरचा व्यक्ती तसा वागत नाही. यामुळे आपल्याला ते सहन होत नाही, आणि आपल्याला वाईट वाटते. असा अनुभव सगळ्यांना येतो. आपल्या बाबतीत काही वाईट आणि वाईट वागणाऱ्यांच्या बाबतीत काही चांगले घडताना दिसले म्हणून नाराज होऊ नका. त्यांनी कोणता खजिना गमावला आणि तुम्ही नकळत कोणत्या संकटावर मात केली, याची तुम्हालाही कल्पना येणार नाही.
यामुळे तुम्ही फक्त सत्कर्म करत राहा. चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते, हे लक्षात ठेवा. देवा हे केवळ माझे म्हणणे नाही तर समस्त पृथ्वीवासियांचे म्हणणे आहे. एक उदाहरण देतो. विष्णू म्हणाले, एक गाय एका खड्ड्यात अडकली होती. अशा अवस्थेत एक चोर तिथून गेला. त्याने गायीला पाहिलं आणि दुर्लक्ष करून निघून गेला. शिवाय काही अंतर पुढे गेल्यावर त्याला सोन्याच्या मोहरांची थैलीसुद्धा मिळाली.
असे असताना, एक साधू तिथून जात असताना त्याने गायीला अडचणीत पाहिलं, तो मदतीला गेला त्याने गायीला बाहेर काढली, पण स्वतः मात्र खड्ड्यात अडकला. हा तुमचा कुठला न्याय आहे सांगा? यावर विष्णू म्हणाले, अरे तुला त्या चोराला मिळालेल्या मोहरा दिसल्या, पण त्याचे काय नुकसान झाले ते मला माहितीय. त्या चोराने गायीला वाचवले असते, तर ते पुण्य कामी येऊन त्याला मोठा खजिना हाती लागणार होता.
शेतकऱ्यांनो शेळीपालनातून लाखोंची कमाई करा, कर्ज आणि सबसिडी जाणून घ्या
पण त्याला मोहरांचा पुरचुंडीवर समाधान मानावे लागले. आणि साधूंनी केलेल्या पुण्यकर्मामुळे त्यांचा आज मृत्यू लिहिलेला होता, पण खड्ड्यात पडण्यावर ते संकट निभावलं. अंगाला चिखल लागले पण मृत्यू टळला. त्यामुळे नारदा, आपण प्राप्त परिस्थितीवर प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो. पण मला प्रत्येक जिवाच्या वर्तमानाचीच नव्हे तर भविष्याचीही काळजी असते. त्यांच्या कर्मानुसार मी फळ देत असतो. यामुळे आपण चांगले काम करत रहा.
महत्वाच्या बातम्या;
एकदा चार्ज केल्यावर 7 महिने चालणार ही कार, जाणून घ्या..
काय सांगता! आता आठवड्यात फक्त 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी, लागु होणार नवा नियम
घोडगंगाचा कोजन, डिस्टलरी प्रकल्प आला नफ्यात, शेतकऱ्यांना होणार फायदा
Published on: 13 June 2022, 04:14 IST