Gold Silver Price: गेल्या काही दिवसांपासून सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) किमतीमध्ये चढ उतार पाहायला मिळत आहे. रशिया आणि युक्रेन युद्धापासून सोने, चांदी आणि इंधनाच्या दराचा (Fuel Rate) भडका उडाल्याचे पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदी त्यांच्या उच्चांक दरापासून स्वस्त मिळत आहे. त्यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करण्याची हीच सुवर्णसंधी मानली जात आहे.
आज 22 कॅरेट सोन्याचा सरासरी भाव 47,300 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,600 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. दुसरीकडे, चांदीचा भाव 54,800 रुपये प्रति किलोवर आला आहे.
शनिवार आणि रविवारी दर जाहीर होत नाहीत
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्टीशिवाय शनिवार आणि रविवारी दर जाहीर करत नाही. गेल्या आठवड्यातील पाचव्या दिवशी शुक्रवारी सोने 426 रुपये प्रति दहा ग्रॅमने स्वस्त होऊन 51668 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 464 रुपये प्रति दहा ग्रॅमने महागले आणि 52094 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
तर चांदी 276 रुपयांनी स्वस्त होऊन 55607 रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 659 रुपयांनी स्वस्त होऊन 55883 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
LIC scheme: 10 लाखांची गुंतवणूक देईल 35 लाख रुपयांचा नफा; अशी करा गुंतवणूक...
सोने 4500 आणि चांदी 24300 पर्यंत स्वस्त होत आहे
सोने सध्या 4532 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च पातळीपासून सुमारे 24373 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.
प्रमुख शहरांमध्ये प्रति दहा ग्रॅम किंमत
चेन्नई : रु 48,050 (22 कॅरेट), 52,420 (24 कॅरेट)
मुंबई : 47,300 (22 कॅरेट), 51,600 (24 कॅरेट)
दिल्ली : 47,450 (२२ कॅरेट), 51,760 (24 कॅरेट)
कोलकाता : 47,300 (22 कॅरेट), 51,600 (24 कॅरेट)
जयपूर : 47,450 (22 कॅरेट), 51,760 (24 कॅरेट)
लखनौ : 47,450 (22 कॅरेट), 51,760 (24 कॅरेट)
पाटणा : 47,330 (२२ कॅरेट), 51,630 (24 कॅरेट)
सुरत : 47,350 (22 कॅरेट), 51,650 (24 कॅरेट)
"महाराष्ट्राच्या धर्तीवर खोके हराम नावाची संघटना, त्यात बोकेही आहेत"
लक्ष द्या
वर दिलेले सोने आणि चांदीचे भाव सूचक आहेत. यात जीएसटी किंवा इतर कोणत्याही कराचा समावेश नाही. निश्चित किंमतीसाठी तुमच्या स्थानिक सराफा किंवा ज्वेलरशी संपर्क साधा. ज्वेलर्स किंवा उत्पादक सोन्याच्या दागिन्यांसाठी वेगळा मेकिंग चार्ज आकारतात.
खरेदी करताना ही माहिती जरूर घ्या. मेकिंग चार्ज सर्व ज्वेलरी उत्पादकांसाठी बदलतो. सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग (Hallmark) कायद्याने बंधनकारक आहे. खरेदी करताना हॉलमार्किंगची खात्री करा. हॉलमार्किंग गुणवत्ता आणि शुद्धतेची हमी आहे.
महत्वाच्या बातम्या:
Monsoon Update: राज्यात पावसाची उघडीप! १ सप्टेंबर पासून पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस...
7th Pay Commission: कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला की नाही? सरकारने दिली माहिती...
Published on: 28 August 2022, 10:25 IST