Others News

Gold Price Today: सणासुदीच्या मुहूर्तावर तुम्हीही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच सुवर्णसंधी आहे. कारण सोन्याच्या दरात निच्चांकी घसरण नोंदवण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता निर्माण झाली आहे. भाव वाढतही आणि घसरतही आहेत.

Updated on 23 September, 2022 9:38 AM IST

Gold Price Today: सणासुदीच्या मुहूर्तावर तुम्हीही सोने (Gold) आणि चांदी (Silver) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच सुवर्णसंधी आहे. कारण सोन्याच्या दरात निच्चांकी घसरण (Fall in price) नोंदवण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता निर्माण झाली आहे. भाव वाढतही आणि घसरतही आहेत.

चलनवाढीचा कल नरम करण्यासाठी यूएस फेड रिझर्व्हने बुधवारी सलग तिसऱ्यांदा व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ केली आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवर सराफा बाजारात तेजी आली आहे.

आदल्या दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपया सात महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर गेला होता. गुरुवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX Gold Price) आणि सराफा बाजारात (Bullion Market) वाढ नोंदवली गेली.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! निर्णय झाला, या दराने मिळणार DA

सोने सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने सोने सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर दिसले. डॉलरच्या निर्देशांकात झालेली वाढ आणि रोखे उत्पन्नात झालेली वाढ यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव दिसून येत आहे.

सराफा बाजारात गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ झाली. असे असतानाही सोने ५० हजार रुपयांच्या खाली आहे. यापूर्वी, फेब्रुवारी 2022 मध्ये सोन्याने 49,200 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठली होती.

इंडिया बुलियन असोसिएशनने गुरुवारी जाहीर केलेल्या किमतीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर ४८ रुपयांनी वाढला आणि तो ४९६५४ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला. त्याचवेळी 999 टच चांदीचा भाव 97 रुपयांनी वाढून 56764 रुपये प्रतिकिलो झाला. सत्राच्या सुरुवातीला सोने 49606 रुपये आणि चांदी 56667 रुपयांवर बंद झाली.

सुवर्णसंधी! सोन्याचे दर ७ महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर; जाणून घ्या आजचे दर

सोने 6300 आणि चांदी 22600 पर्यंत स्वस्त होत आहे

सोने सध्या 6306 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च पातळीपासून सुमारे 22637 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.

याप्रमाणे सोन्याचे नवीनतम दर जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच वारंवार येणाऱ्या अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

महत्वाच्या बातम्या:
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा! 24 तासांत या राज्यांमध्ये दिसणार मुसळधार पावसाचा कहर
शेतकऱ्याला मिळालं कष्टाचं फळ! सोयाबीन रोपाला लागल्या तब्बल 417 शेंगा

English Summary: Gold Price Today: Record breaking fall in the price of gold! know new rates
Published on: 23 September 2022, 09:28 IST