सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोने चांदीच्या (gold silver) दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्यापूर्वी आजचे दर काय आहेत, याविषयी माहिती जाणून घ्या.
दिल्ली सराफा बाजारात आज सोने 139 रुपयांनी स्वस्त झाले आणि त्याची किंमत 50326 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली. MCX वर सोन्याचा ऑक्टोबर (October) करार शुक्रवारी 49,399 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला आणि 6 महिन्यांच्या नीचांकी 49,250 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.
लाल कंधारी गाय शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आधार बनेल; दूध उत्पादनातून मिळतो लाखोंचा नफा
MCX वर सोन्याला 48,800 वर पहिला सपोर्ट आहे तर दुसरा मोठा सपोर्ट 47,700 रुपयांवर आहे. जोपर्यंत जागतिक मंदी, महागाई, रुपयाची घसरण यांसारखी आव्हाने कायम राहतील, तोपर्यंत सोन्यामधील कमजोरी कायम राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात भाव (Prices in the international market) घसरल्याने किमतीवर दबाव आहे. देशांतर्गत बाजारात, MCX वर सोने सध्या 554 रुपयांनी घसरून 49446 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कांद्यापाठोपाठ लसणाच्या दरात मोठी घट होण्याची शक्यता; पहा आजचे दर
चांदी आज 363 रुपयांनी स्वस्त झाली आहे
दिल्लीत आज चांदीचा भाव 363 रुपयांनी घसरून 58366 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गुरुवारी तो ५८७२९ रुपये प्रतिकिलोवर बंद झाला होता. MCX वर देशांतर्गत बाजारात सध्या चांदी 1747 रुपयांनी घसरत असून 56280 रुपये प्रति किलो पातळीवर आहे.
स्पॉट सिल्व्हर सध्या $18.88 प्रति औंस पातळीवर आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे (HDFC Security) वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, डॉलर निर्देशांकात वाढ झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या किमती दबावाखाली आहेत. स्पॉट मार्केटमध्ये डॉलर इंडेक्स सध्या 112.72 च्या पातळीवर आहे जो एक नवीन रेकॉर्ड आहे.
महत्वाच्या बातम्या
दिलासादायक! फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर मिळणार ५०% सबसिडी; घ्या असा लाभ
आज विदर्भातील काही जिल्ह्यात 'यलो' अलर्ट जारी; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
'या' ५ राशींचा ठरणार वरदान काळ, धनलाभाची मोठी शक्यता; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
Published on: 24 September 2022, 11:24 IST