Others News

आंतरराष्ट्रीय बाजारातील काही घडामोडीचा सरळ परिणाम सोन्याच्या दरावर होत असून बऱ्याच दिवसापासून उच्चांकी पातळीवर असलेल्या सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू असून सोमवारपासून मात्र सोन्याच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन श्रावण महिन्यात सोने खरेदी करण्याची एक सुवर्णसंधी गुंतवणूकदारांसाठीआणि सोने खरेदीची हौस असलेल्या व्यक्तींसाठी खूप महत्त्वाचे आहे.

Updated on 04 August, 2022 10:31 AM IST

आंतरराष्ट्रीय बाजारातील काही घडामोडीचा सरळ परिणाम सोन्याच्या दरावर होत असून बऱ्याच दिवसापासून उच्चांकी पातळीवर असलेल्या सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू असून सोमवारपासून मात्र सोन्याच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन श्रावण महिन्यात सोने खरेदी करण्याची एक सुवर्णसंधी गुंतवणूकदारांसाठीआणि सोने खरेदीची हौस असलेल्या व्यक्तींसाठी खूप महत्त्वाचे आहे.

जर 22 कॅरेट सोन्याचे ताज्या दरांचा विचार केला तर दहा ग्रॅम सोन्याची किंमत 47 हजार एकशे पन्नास रुपये तर 24 कॅरेट साठी 51 हजार 440 रुपये आहे, तर दहा ग्रॅम(1भार)चांदीचा दर 575 रुपये आहे.

नक्की वाचा:आनंदवार्ता! सणासुदीच्या मुहूर्तावर सोने 4700 आणि चांदी 22000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दर...

देशामध्ये अवतरणार 'वन गोल्ड वन रेट' योजना

 संपूर्ण देशामध्ये वन गोल्ड वन रेट योजना लागू करण्याची मागणीला सध्या मोठ्या प्रमाणात होत असून यामागे कारण आहे की सोने दिल्लीत दुसरा दराने विकले जाते तर पाटण्यात दुसऱ्या दराने.

जर तुम्ही संपूर्ण भारताचा विचार केला तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये तुम्हाला सोन्याच्या किमती मध्ये मोठा फरक दिसून येतो. सोने तेच त्याची शुद्धता देखील तीच परंतु  सोन्याच्या आयात होते तेव्हा ते जहाज मार्गे होत असल्याने बंदरांवर आल्यानंतर त्याचे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वितरण करण्यात येते.

यामध्ये वाहतूक खर्च म्हणजेच शिपिंग खर्च जर जोडला तर त्यामुळे सोन्याच्या किमती मध्ये तफावत आढळून येते. परंतु आयात केलेल्या सोन्याची किंमत एकच असते त्यामुळे येत्या काळात देशात वन गोल्ड वन रेट येण्याच्या हालचाली सुरू आहेत.

नक्की वाचा:सोने खरेदीदारांसाठी खुशखबर! 10 ग्रॅम सोने खरेदी करा फक्त 30156 रुपयांना; पहा नवे दर...

काही प्रमुख शहरातील 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रामचे भाव

1- मुंबई- 51 हजार 440 रुपये प्रति तोळा

2- नागपूर- 51 हजार 470 रुपये प्रति तोळा

3- पुणे- 51 हजार 470 रुपये प्रति तोळ

4- दिल्ली- 51 हजार सहाशे रुपये प्रति तोळा

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

दागिन्यांची शुद्धता जाणून घेण्याचा एक मार्ग आहे. वास्तविक, हॉलमार्कशी संबंधित अनेक प्रकारचे चिन्ह दागिन्यांवर आढळतात. या चिन्हांवरून दागिन्यांची शुद्धता कळू शकते. त्याचे स्केल एक कॅरेट ते 24 कॅरेट पर्यंत आहे. देशात दागिन्यांचे हॉलमार्किंग अनिवार्य आहे.

नक्की वाचा:LIC Policy: महिन्याला 794 रुपये भरा आणि मिळवा 5 लाख 25 हजार रुपये,एलआयसीची 'ही' पॉलिसी आहे फायदेशीर

English Summary: gold and silver rate decrease so golden chance to buy gold
Published on: 04 August 2022, 10:31 IST