Others News

पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत, ज्याचा लाभार्थ्यांना चांगला परतावा मिळतो. विशेष म्हणजे आता पोस्ट ऑफिसमध्ये नवा नियम लागू करण्यात आला आहे. ज्याचा लाभ गुंतवणूकदारांना मिळेल.

Updated on 23 October, 2022 4:35 PM IST

पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना (scheme) आहेत, ज्याचा लाभार्थ्यांना चांगला परतावा मिळतो. विशेष म्हणजे आता पोस्ट ऑफिसमध्ये नवा नियम लागू करण्यात आला आहे. ज्याचा लाभ गुंतवणूकदारांना मिळेल.

आता पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेले ग्राहक (customer) इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर देखील करू शकतात. टपाल कार्यालयाकडून एनईएफटी आणि आरटीजीएसची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच RTGS ची सुविधा देखील 31 मे पासून सुरू झाली आहे.

म्हणजेच आता पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना पैसे (Money) पाठवण्याची सुविधा मिळणार आहे. यासोबतच इतर बँकांप्रमाणे ते अधिक यूजर फ्रेंडली होत आहे. ही सुविधा तुमच्यासाठी 24×7×365 असेल.

देशी बटाट्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; 'या' पद्धतीचा वापर केल्यास मिळणार दुप्पट उत्पन्न

NEFT आणि RTGS द्वारे पैसे पाठवणे सोपे

सर्व बँका NEFT आणि RTGS ची सुविधा देतात आणि आता पोस्ट ऑफिस देखील ही सुविधा देत आहे. NEFT आणि RTGS द्वारे दुसऱ्या खात्यात पैसे पाठवणे खूप सोपे झाले आहे.

याच्या मदतीने तुम्ही पटकन पैसे ट्रान्सफर करू शकता. वास्तविक, ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने निधी हस्तांतरित करू शकतात. यासाठी अटी व शर्तीही आहेत. एनईएफटीमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा नाही, तर आरटीजीएसमध्ये तुम्हाला एकावेळी किमान दोन लाख रुपये पाठवावे लागतील.

सावधान! पुढच्या 24 तासात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

खर्च 

यासाठी तुम्हाला काही शुल्क देखील द्यावे लागेल. जर तुम्ही NEFT करत असाल तर तुम्हाला यामध्ये 10 हजार रुपयांपर्यंत 2.50 रुपये + GST भरावा लागेल. 10 हजार ते 1 लाख रुपयांसाठी 5 रुपये + जीएसटी आहे. त्याच वेळी, 1 लाख ते 2 लाख रुपये, 15 रुपये + जीएसटी आणि 2 लाखांपेक्षा जास्त रकमेसाठी 25 रुपये + जीएसटी भरावा लागेल.

महत्वाच्या बातम्या 
काय सांगता! सोन्या-चांदीपेक्षा महाग आहे 'हे' लाकूड; किंमत ऐकाल तर व्हाल चकित
शेतकऱ्यांनो 'या' चारा पिकांचा बनवा मुरघास; दूध उत्पादनात होणार वाढ
भारताकडून तांदूळ निर्यातीवर बंदी; तांदळाच्या किमतीत 10% टक्क्यांनी वाढ

English Summary: glad tidings post office investors important facility
Published on: 23 October 2022, 04:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)