आयटीआर भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै असून या मुदतीपूर्वी आयटीआर भरणे बंधनकारक आहे. बरेच जण प्राप्तिकराच्या कक्षेत येत नाहीत. त्यामुळे बरेच जण आयटीआर भरण्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु तुम्ही प्राप्तिकराच्या कक्षेत येत नसाल तरीही तुम्ही आयटीआर फाईल करावे.
कारण बरेच जण आयटीआर फाईल करण्याकडे दुर्लक्षच करतात. परंतु त्याचे आपल्याला खूप काही मोठे फायदे मिळतात. त्यामुळे आपण या लेखांमध्ये आयटीआर फाईल करण्याचे कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊ.
करा आयटीआर फाईल आणि मिळवा हे फायदे
1- बँकेतून सहज कर्ज मिळते- जर तुम्ही आयटीआर भरत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असून सर्व सरकारी आणि खासगी संस्थांनी तुमचा उत्पन्नाचा पुरावा म्हणून आयटीआरला स्वीकारले आहे. जर तुम्ही नियमितपणे आरटीआर फाईल करत असाल तर तुम्हाला कुठल्याही बँकेकडून सहजपणे कर्ज मिळू शकते.
नक्की वाचा:बुस्टर डोस’बाबत मोदी सरकारची मोठी घोषणा, लोकांचा होणार फायदा!
2- व्यवसाय सुरू करणे- जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला आयटीआर भरणे आवश्यक आहेच. तसेच कोणत्याही विभागासाठी करार करायचा असेल तर आयटीआर दाखवावा लागतो. जर तुम्हाला एखादा कंत्राट मिळवायचे असेल तर तुम्हाला पाच वर्षाचा आयटीआय फाईल दाखवावा लागतो.
3- उत्पन्नाचा पुरावा म्हणून- जेव्हा तुम्ही आयटीआर दाखल करतात तेव्हा तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळते. ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो त्या ठिकाणाहून फॉर्म सोळा दिला जातो.
हा एक उत्पन्नाचा नोंदणीकृत पुरावा असणे तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज किंवा स्वतःचे क्रेडिट सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे ठरते.
4- पत्त्याचा पुरावा म्हणून उपयोगी- आयटीआर पावती तुम्ही नोंदणी केलेल्या पत्त्यावर पाठवले जाते. त्यामुळे आयटीआय फाईल केल्याची पावती तुमचा पत्त्याचा पुरावा म्हणून देखील ग्राह्य धरली जाते.
5- व्हीसा मिळण्यासाठी - अनेक देशांचे व्हीसा अधिकारी व्हीसासाठी आयटीआर मागतात.
जर तुम्हाला त्यांच्या देशात जायचे आहे तर तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे हे त्याद्वारे तपासले जाते.
6- विमा कंपन्यांकडून मागणी- जर तुम्हाला एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण घ्यायचे असेल तर विमा कंपनी तुम्हाला आयटीआर मागू शकतात. अशा कंपन्या तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत जाणून घेण्यासाठी आयटीआर मागतात.
Published on: 15 July 2022, 01:23 IST