Others News

देशभरात पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढत चाललेल्या किमती पाहून लोक सीएनजीकडे अधिक वळू लागले आहेत. कारण पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी कार चालवणे खूपच स्वस्त झाले आहे. या अनुषंगाने आम्ही तुम्हाला अशाच काही कारबद्दल सांगणार आहोत ज्या उत्कृष्ट मायलेज देतात. या महागाईच्या युगात तुम्हीही कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशाच 3 सर्वोत्तम सीएनजी कार बद्दल सांगणार आहोत, ज्या केवळ 8 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.

Updated on 17 May, 2022 4:53 PM IST

मारुती सुझुकी अल्टो 800 CNG;
पेट्रोल व्हर्जनमध्ये मारुती सुझुकी अल्टो 800 चे मायलेज 22.05 kmpl आहे. मारुती सुझुकी अल्टो 800 ची सीएनजी आवृत्ती ३१.५९ किमी/किलो/ली मायलेज देण्याचा दावा करते. यामुळेच ती देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मायलेज असलेल्या सीएनजी कारच्या श्रेणीत येते. सीएनजीचा दर बघितला तर ही गाडी 1 रुपया 38 पैशांमध्ये एक किलोमीटर धावू शकते.

मॅन्युअल ट्रान्समिशनसह 796 सीसी इंजिन देखील उपलब्ध आहे. तुम्ही याचे ट्रान्समिशन पर्याय पाहिल्यास, यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील मिळतो. सध्या बाजारात त्याची किंमत ४.८९ लाख ते ४.९५ लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजी;
Maruti Suzuki WagonR CNG मायलेज 32.52 kmpl पासून सुरू होते आणि 34.05 km/kg पर्यंत जाते. या कारच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये आणखी अनेक अपडेट फीचर्स पाहायला मिळत आहेत. हे 1197 cc इंजिनद्वारे समर्थित आहे, जे 88.5 bhp पर्यंत पॉवर जनरेट करू शकते. WagonR CNG चे LXi आणि VXi असे दोन प्रकार आहेत. ज्याची एक्स-शोरूम किंमत 6.42 लाख रुपये आणि ऑन-रोड किंमत 7.23 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी;
सध्या भारतातील सर्वाधिक मायलेज असलेल्या CNG गाड्यांबद्दल बोलायचे झाले तर, तुमच्याकडे मारुती सुझुकी न्यू सेलेरियो हा सर्वोत्तम पर्याय आहे जो 35.60 किमी/kgpl मायलेज देतो. Celerio CNG ची किंमत 6.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. अशा परिस्थितीत ही सीएनजी कार चालवण्याचा खर्च दुचाकी चालवण्याच्या खर्चापेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या;
मोदींचा एक निर्णय आणि जगात मोठी खळबळ, आंतरराष्ट्रीय बाजारात घडणार मोठ्या घडामोडी...
मोठ्या लोकांना सोडता आणि शेतकऱ्यांना पिडता, न्यायालयाने बँक ऑफ महाराष्ट्रला झापले
बातमी कामाची! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो कांदा बिहार केरळमध्ये विका, व्हाल मालामाल...

English Summary: Find out the top 3 CNG cars with 30-40km mileage and lowest prices
Published on: 17 May 2022, 04:53 IST