Others News

जर तुम्हाला एफडी मध्ये गुंतवणूक करायचे असेल किंवा तुम्ही विचार करत असाल तर ही बातमी फार महत्वाचे आहे. कारण एफडी करताना बँकेचे निवड करण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होईल.

Updated on 19 July, 2022 8:55 PM IST

 जर तुम्हाला एफडी मध्ये गुंतवणूक करायचे असेल किंवा तुम्ही विचार करत असाल तर ही बातमी फार महत्वाचे आहे. कारण एफडी करताना बँकेचे निवड करण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होईल.

फेडरल बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या दोनही बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली असून दोन कोटी रुपयांपेक्षा कमी ठेव असलेल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली असून नवीन व्याजदर 18 जुलै 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. या लेखात आपण कोणत्या बँकेने किती व्याजदर वाढवले याबद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:या' योजनेत दरमहिना फक्त 210 रुपये जमा करा आणि मिळवा 5,000 रुपये पेन्शन

 फेडरल बँक

 जर आपण खासगी बँकांच्या विचार केला तर सहा महिन्यांच्या एफडी साठी 5.25 टक्के व्याजदर उपलब्ध आहे तर नऊ महिन्याच्या एफडीवर 4.80 टक्के दराने व्याज मिळत आहे. एक वर्षाच्या मुदतीच्या एफडीवर 5.45 टक्के व्याजदर मिळत असून दोन वर्षाच्या मुदत ठेवी वर 5.75 टक्के व्याजदर मिळेल.

बँक 750 दिवसाच्या एफडीवर सहा टक्के दराने व्याज देत आहे तर 75 महिने मुदतीच्या ठेवीवर 5.95 टक्के दराने व्याज मिळेल.

नक्की वाचा:योजना सरकारच्या: व्यवसायासाठी कुठल्याही हमीशिवाय 'ही' योजना देईल सर्वसामान्यांना कर्ज, होईल फायदा

 आयडीएफसी फर्स्ट बँक

 आयडीएफसी फर्स्ट बँक 500 दिवस ते दोन वर्षाच्या मुदतीचे एफडीवर 6.5 टक्के व्याज दर देते. बँकेला आता तीन वर्ष ते पाच वर्ष मुदतीच्या एफडीवर 6.25 टक्‍क्‍यांऐवजी 6.50 टक्के व्याज मिळणार आहे.

येस बँकेचा एफडीबाबत अलर्ट

 जर तुमचे येस बँकेत एफडी खाते असेल तर बँकेने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की जर एफडी खाते वेळेपूर्वी खंडित झाले असेल तर आता अधिक दंड भरावा लागेल.

दंड तसा याआधीही वापरला जात होता परंतु आता त्याची रक्कम वाढवण्यात आली आहे. काही ग्राहक तातडीच्या कारणामुळे त्यांचे एफडी खाते मुदत पूर्ण होण्यापूर्वी बंद करतात.

नक्की वाचा:घाई करा मुदत संपत आहे!वर्षाला भरा 299 रुपयेचा हप्ता आणि मिळवा दहा लाखांचा विमा,वाचा या योजनेविषयी तपशील

English Summary: fedral bank and idfc first bank growth interest rate for fixed diposit
Published on: 19 July 2022, 08:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)