Others News

कर्मचाऱ्यांच्या असो किंवा सर्वसामान्य जनतेच्या अनेक समस्या तसेच जीवन जगत असताना ते सुकर जगता यावे यासाठी केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी बऱ्याच प्रकारच्या योजना राबवत असते. जर आपण यामध्ये विचार केला तर बऱ्याच योजनांचा समावेश यामध्ये करता येईल. अशीच एक योजना संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीआहे ती म्हणजेच भविष्य निर्वाह निधी संघटना होय.

Updated on 23 August, 2022 12:00 PM IST

कर्मचाऱ्यांच्या असो किंवा सर्वसामान्य जनतेच्या अनेक समस्या तसेच जीवन जगत असताना ते सुकर जगता यावे यासाठी केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी बऱ्याच प्रकारच्या योजना राबवत असते. जर आपण यामध्ये विचार केला तर बऱ्याच योजनांचा समावेश यामध्ये करता येईल. अशीच एक योजना संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीआहे ती म्हणजेच भविष्य निर्वाह निधी संघटना होय.

नक्की वाचा:7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार अडीच पटीने वाढणार!

या योजनेला कर्मचारी पेन्शन योजना असे देखील संबोधले जाते. परंतु सरकारने आता या योजनेच्या संबंधित एक फार महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून समजा जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर अगोदर त्याच्या विधवा पत्नीला पेन्शन मिळत होती परंतु आता संबंधित आई आणि वडिलांना देखिला जीवन मासिक पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

जर आपण यासंबंधी इपीएफोने केलेले ट्विट चा आधार घेतला तरत्यानुसार eps-95 या योजनेच्या माध्यमातून पालक आणि वारसांना फायदा या शीर्षकाखाली योजनेतील हा महत्त्वाचा बदल जाहीर करण्यात आला आहे.

नक्की वाचा:Silver And Gold Rate: चांदीत 4500 ते सोन्यात 1 हजार रुपयांची घसरण,गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदीची संधी

कर्मचार्‍याच्या पत्नीला जेवढे मासिक पेन्शन मिळेल तेवढेच पेन्शन हे आजीवन कर्मचाऱ्यांच्या आई आणि वडिलांना देखीलदेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे.तसे पाहायला गेले तर आई आणि वडिलांचे नाव संबंधित

कर्मचाऱ्यांच्या वारस म्हणून जोडले नसले तरीसुद्धा या योजनेच्या माध्यमातून काही कागदपत्रांच्या आधारे संबंधित कर्मचाऱ्यांच्या पालकांना हा फायदा दिला जाणार आहे. त्यामुळेगट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पालकांना फार मोठा दिलासा या निर्णयाच्या माध्यमातून मिळणार आहे.

नक्की वाचा:Update: राज्यातील होमगार्डना मिळणार 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण,वाचा सविस्तर माहिती

English Summary: epfo take big decision about give benifit to parents of employee
Published on: 23 August 2022, 12:00 IST