New Delhi : घरात वीज कनेक्शन नसताना एका कुटुंबाला तब्बल एक लाख चार हजारांहून अधिक बिल पाठवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपूर मधील ही घटना आहे. यातून जौनपूरमधील वीज विभागाच्या निष्काळजीपणाचा प्रकार उघडीस आला आहे. जौनपूर जिल्ह्यातील सिकरारा भागातील वनसफा गावातील एका वस्तीत राहणाऱ्या राम खेलवान यांच्या कुटुंबाला एक लाख चार हजारांहून अधिक बिल पाठवण्यात आले.
घराला वीज कनेक्शन नसताना एवढं बील आलेच कसे? असा प्रश्न त्यांना पडला. शिवाय या गंभीर प्रश्नाकडे कोणीच लक्ष देत नाही त्यामुळे या
कुटुंबीयाना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.राम खेलावन यांच्या घरी अद्याप वीज पोहोचलेली नाही शिवाय त्यांनी कधीही वीज कनेक्शनसाठी अर्जदेखील केला नाही.
तरीदेखील त्यांच्या नावावर तब्बल एक लाख चार हजार तीनशे बारा रुपयांचे वीज बिल आले. त्यांनी यासाठी वारंवार स्थानिक उपकेंद्राच्या कार्यालयात चकरा मारल्या. तरीही त्यांची सुनावणी होत नसल्याचे पीडित कुटुंबीयांनी सांगितले. राम खेलावन यांनी या बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी आतापर्यंत जिल्हा वीज कार्यालय ते स्थानिक कार्यालयापर्यंत संपर्क साधला मात्र कोणतीच माहिती हाती लागली नाही.
महाराष्ट्र स्टार्टअप वीक २०२२, आत्ताच अर्ज करा आणि १५ लाख रुपयांची सरकारी ऑर्डर मिळवा
शेवटी पीडित कुटुंबीयांनी या संदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून मदतीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून न्याय हवाय असं पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. विजेचं कनेक्शन नसताना राम खेलावन यांच्या घरी जवळजवळ एक लाखाहून अधिकचे बिल आलेलं आहे.
LPG Price Hike : आता सर्वसामान्यांनी जगायचे कसे..! गॅस सिलेंडर झाला हजाराच्या पार
धक्कादायक बाब म्हणजे खेलावन यांच्या परिसरात ना कोणता विद्युत खांब आहे, ना कोणती तार. साधा एक बल्बही न लावता एवढ्या रकमेचे विजेचे बिल त्यांना आले आहे. त्यामुळे पीडित कुटुंबाची अवस्था वाईट झाली आहे. राम खेलावनयांनी यांनी या प्रकरणाबाबत उपकेंद्रापासून ते जिल्हा विद्युत कार्यालयापर्यंत अनेक चकरा मारल्या, मात्र तरीही या प्रकरणाचा तपास करूनही कोणतीच सुधारणा झाली नाही.
महत्वाच्या बातम्या:
काय सांगता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्यासाठी पुण्यातील आंबे
Published on: 19 May 2022, 11:07 IST