असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी ई श्रम कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत बरेच लोक या योजनेत सहभागी झाले असूनया योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पहिला हप्ता आधीच जारी करण्यात आला आहे.
आता लाभधारकांना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.या पार्श्वभूमीवर ई श्रम कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पुढील हप्ता लवकरच कार्डधारकांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे.योजना कामगार मंत्रालयामार्फत चालवली जाते
.यातील पहिला हप्ता अनेकांच्या खात्यावर जमा करण्यात आला असून आता लोक त्याच्या दुसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत.बातम्यांनुसार सरकार लवकरच ई श्रम योजनेअंतर्गत मिळणारा दुसरा हप्ता जारी करू शकते.मीडिया रिपोर्टनुसार,या महिन्याच्या अखेरीस लाभार्थ्यांना दुसरा त्याची रक्कम मिळू शकते.
तुमच्या खात्यात पैसे आले की नाही तपासा या पद्धतीने
जेव्हा दुसरा हप्ता जारी करण्यात येईल तेव्हा तुम्हाला हे पैसे मिळाले की नाही हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला कळू शकते.
यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर एक मेसेज येतो,ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे आल्याची माहिती दिली जाते. जर काही कारणास्तव तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन तुमच्या पासबुक मध्ये एन्ट्री मिळू शकतात.
या कार्ड चे फायदे
1-या कार्डाच्या माध्यमातून तुम्ही अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात.
2- दर महिन्याला तुमच्या खात्यात एक हजार रुपये आर्थिक साहाय्य म्हणून दिले जातात.
3- वृद्धापकाळात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक सामना करावा लागू नये म्हणून सरकार तुम्हाला पेन्शनच्या स्वरूपात काही रक्कम देऊ शकते.
4- जर तुमच्या घरातमुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांना पुढील शिक्षणासाठी सरकार शिष्यवृत्ती देखील देते.
5- जर एखादा मजूर एखाद्या अपघातात अपंगत्व आले तर दहा हजार रुपयांची रक्कम दिली जाते. दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून सरकार दोन लाख रुपये देणार आहे.
याप्रमाणे तुम्हीसुद्धा ई श्रम कार्ड साठी करू शकतात नोंदणी
यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला श्रमिक पोर्टल च्या eshram.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही फॉर्म भरून तो सबमिट करू शकतात. तसेच सरकारने 14434 टोल फ्री क्रमांक देखील यासाठी ठेवला आहे.
यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड, तसेच मोबाईल नंबर आधारशी लिंक करणे आवश्यक असून तुमचा मूळ पत्त्याचा पुरावा, बँक खात्याचा तपशील आणि पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी कागदपत्रे लागतात.
नक्की वाचा:भले शाब्बास मायबाप सरकार…! मुलींच्या लग्नासाठी 'हे' राज्य सरकार देणार 51 हजार
Published on: 18 June 2022, 02:43 IST