कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सर्व पीएफ खातेधारकांना आता नॉमिनी निवडणे सक्तीचे केले असून पीएफ धारकांनी अजून पर्यंत नॉमिनी निवड केलेली नाही, अशा लाभार्थ्यांना ईपीएफओने काही फायद्यापासून वंचित ठेवले जाईल असे म्हटले आहे. जर पीएफ खातेधारकांना ई नामांकन केले नसेल तर त्यांना आता खात्यातील शिल्लक ऑनलाईन तपासणी शक्य होणार नाही.
त्यामुळे सगळ्या लाभार्थ्यांनी ई नॉमिनेशन करून घेणे महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया अत्यंत सहज आणि सोपी असून भविष्यातील होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी हे करून घेणे गरजेचे आहे.
ई-नॉमिनेशनचे फायदे
यामध्ये नॉमिनी व्यक्तीची निवड करुन पीएफ खातेधारकांचा मृत्यू झाला तर खातेदाराला त्यांच्या मृत्यूनंतर पैसे देऊ इच्छित आहे त्याच्याकडे पैसे जातात. स्वतः पीएफ खातेदार आणि संबंधित खातेदाराचे कुटुंबाना जर पीएफ फायदे हवे असतील तर त्यांच्यासाठी ई नामांकन खूप महत्त्वाचे आहे.
समजा एखाद्या पीएफ धारकाचा मृत्यू झाला तर ई नोमिनेशन केल्यावरच त्याला भविष्य निर्वाह निधी, मिळणारी पेन्शन व विम्याचे फायदे, ऑनलाइन क्लेम आणि सेटलमेंट शक्य होणार आहे. ई नोमिनेशन तुम्ही घरी बसून ऑनलाइन देखील करू शकतात.
ऑनलाइन ई-नोमिनेशन करण्याची प्रक्रिया
1-epfindia.gov.in या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे.
2- यामधील सर्विस म्हणजे सेवा या टॅबमध्ये ड्रॉप-डाऊन मेन्यू मधून 'कर्मचाऱ्यांसाठी' असलेल्या टॅब वर क्लिक करावे.
3- त्यानंतर तुम्ही तुमचा युएएन नंबरच्या साह्याने लॉग इन करावे.
4- त्यानंतर तुम्हाला एक मॅनेज टॅब दिसेल व यामध्ये ई नामांकन याची निवड करावी.
5- त्यानंतर तुमचा कायम आणि सध्याचा पत्ता नमूद करावा.
6- त्यानंतर कुटुंब घोषणा बदलण्यासाठी होय हा पर्याय निवडा.
7- त्यानंतर नॉमिनीचा तपशील नमूद करावा आणि सेवर क्लिक करावे.
8- आता ई साईन चिन्हावर क्लिक करून पुढे जावे.
9- नंतर स्वतःचा आधार क्रमांक नमूद करावा आणि रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल तो नमूद करावा.
10- ही प्रक्रिया झाल्यानंतर तुमचे ई नॉमिनेशन अपडेट होते.
नॉमिनी कुणाला बनवू शकतात?
पीएफ खातेधारक फक्त त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना नॉमिनेट करू शकतात. परंतु काही परिस्थिती एखाद्या व्यक्तीचे कुटुंब नसेल तर तो अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीला आपला नॉमिनेट म्हणून घोषित करू शकतो. यामध्ये जर एखाद्या पीएफ धारकाने नॉमिनीची निवड न करता मृत्यू झाला तर कुटुंबाला संबंधित पीएफचे पैसे मिळण्यासाठी अनेक त्रासांना सामोरे जावे लागते.
नक्की वाचा:शेतमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के अनुदान; आजच करा अर्ज
Published on: 03 October 2022, 10:42 IST