नवी दिल्ली: भारतात 166 अब्जाधीश आहेत. तर त्यापैकी फक्त 18 जणांनी टॉप 500 अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) ऑफ इंडियाचे मालक सायरस पूनावाला (Cyrus Poonawala) यांचा ही यामध्ये समावेश आहे. कोरोना काळात जगाला लस देणाऱ्या सायरस पुनावाला यांची संपत्ती किती आहे? आज पाहणार आहोत..
सायरस पूनावाला यांची संपत्ती
सायरस पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादी 2022 नुसार त्यांची एकूण संपत्ती $24.3 अब्ज आहे.
Eknath Shinde: शेतकऱ्यांना सप्टेंबरपासून 50 हजारांचे अनुदान मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
सिरम इन्स्टिट्यूटचा प्रवास
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही व्हॅक्सीन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोनावरील लसीची निर्मिती इथं मे महिन्यापासून सुरू आहे. सायरस पुनावाला यांनी पुण्यातील हडपसर भागात 1966 साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली.
सायरस पूनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लसी तयार करण्यासाठी केला जातो. त्यातूनच सायरस पूनावाला हे लस निर्मितीच्या व्यवसायात उतरले आणि सीरम इन्स्टिट्यूटचा प्रवास सुरू झाला.
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार अडीच पटीने वाढणार!
सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवरती ज्या लसींचा उपयोग केला जातो.
त्यापैकी 65 टक्के लसी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचा ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्रा झेनेका यांच्या सोबत करार झालाय.
Published on: 23 August 2022, 06:41 IST