भारत हा कृषिप्रधान देश आहे.आपल्या देशामध्ये बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात.शेती हा देशातील शेतकरी वर्गाचा मुख्य व्यवसाय आहे. परंतु या बरोबरच काही लोक शेतीला(farming) पूरक व्यवसाय म्हणजेच जोड व्यवसाय करतात. या मध्ये कुक्कुटपालन,मत्स्य व्यवसाय, रेशीम उद्योग,दुग्ध व्यवसाय असे बरेचसे व्यवसाय आहेत की जे लोकल शेतीबरोबरच करू इच्छितात.
शेती आणि शेतीबरोबरच असणारे पूरक व्यवसाय म्हणजेच जोड व्यवसाय या बद्दल माहिती देणार आहोत. जेणेकरून हे व्यवसाय करून तुम्हाला फायदाच फायदा होईल.
1)दुग्धव्यवसाय:-
दुग्धव्यवसाय आपण शेती सोबत करू शकतो.शेळी,मेंढी,गाय,म्हैस यांसारखे जनावरांचे पालन करून त्यांचा मिळत असलेल्या दुधापासून खूप सारे पदार्थ आपण बनवून विकू शकतो, तसेच आपण दुध डेअरी मध्ये जाऊन विकू शकतो. हा व्यवसाय शेतीला पूरक असल्यामुळे शेतीमध्ये पिकणारे पीक देखील आपण त्यांना अन्न म्हणून खाऊ घालू शकतो. बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरी दुग्धव्यवसाय हा जोड व्यवसाय केला जातो.
हेही वाचा:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकार वाढवणार शेडनेट अनुदान
2)मत्स्य व्यवसाय:-
मत्स्य व्यवसाय प्रामुख्याने कोकणी भागात केला जातो.तेथील शेतकरी हे मत्स्य व्यवसाय हे जोड व्यवसाय म्हणून करतात. यामध्ये देखील खूप फायदा आहे. मत्स्य पासून आपण सुकट, बोंबील यांसारखे खाद्य पदार्थ बनवू शकतो. कोकणी किनारपट्टी वर समुद्र असल्यामुळे त्या लोकांना मासे पकडण्यासाठी सोयीस्कर पडते. त्यामुळे तिथे शेतीसोबतच मत्स्य व्यवसाय केला जातो.
3)कुकुटपालन:-
कुकुटपालन हा व्यवसाय देखील शेतीसोबत करण्यासारखा आहे. त्यामध्ये आपल्याला खूप सारे फायदे मिळून जातात. कुकूटपालन म्हणजेच कोंबड्या पाळणे. यामध्ये देखील खूप नफा आपल्या मिळून जातो कोंबड्यांनी घातलेले अंडे आपण विकू शकतो तसेच आपण कोंबड्या विकू शकतो आणि त्यात गावरान कोंबडा म्हटलं की विचारुच नका.
4)रेशीम उद्योग:-
रेशीम उद्योग शेतीसोबत करण्यासारखा आहे. रेशीम च्या विष्ठेपासून जनावरांना खाद्य बनवू शकतो. ती विष्ठा आपण जनावरांना दिल्यानंतर गाईचे किंवा म्हशीचे एक ते दीड लिटर दूध वाढते. त्याचा उपयोग गोबर गॅस बनवण्यासाठी केला जातो. कोश मेलेल्या प्युपाचा सौंदर्य प्रसाधनासाठी देखील उपयोग केला जातो.बघितलं तर रेशीम कोशा शिवाय 14 दिवसात चांगले उत्पन्न देणार आज जगात एकही नगदी पीक नाही.अश्या प्रकारे आपण हे जोडव्यवसाय करून मुबलक प्रमाणात फायदाच फायदा मिळवू शकतो.
Published on: 11 June 2021, 05:27 IST