Others News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत (PM Kisan Samman Nidhi Yojana) घोटाळा झाला आहे. तमिळनाडू राज्यात या योजनेत घोटाळ झाल्यानंतर सरकार आता सर्तक झाले आहे.

Updated on 29 September, 2020 7:16 PM IST


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत (PM Kisan Samman Nidhi Yojana) घोटाळा झाला आहे. तमिळनाडू राज्यात  या योजनेत घोटाळ झाल्यानंतर सरकार आता सर्तक झाले आहे. मोदी सरकारने सुरु केलेली ही योजना खूप महत्त्वाकांक्षी होती. अनेक शेतकऱ्यांना या योजनेच्या अंर्तगत वार्षिक ६ हजार रुपयांची मदत केली जाते. पण तामिळनाडूमध्ये मात्र या योजनेत खोटी माहिती देऊन लाखो रुपये लाटल्याचे समोर आले आहे. दरम्यान सरकार आता सर्तक झाले असून बनावट लाभार्थ्यांकडून पैसा वसूल केला जात आहे.

हेही वाचा : पीएम किसान योजना : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी ; अशाप्रकारे करा अर्ज

आतापर्यंत ६१ कोटी रुपय वसूल करण्यात आले आहेत. यामुळे तुम्हीही आपली माहिती तपासून पाहा. जर अर्जात काही चुकीची माहिती दिली असेल तर सरकार तुमच्याकडून पैसा वसूल करेल. हे या घटनेतून सिद्ध झाले आहे. तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट लाभार्थी सापडल्याने सरकार आता सर्व राज्यातील लाभार्थ्यांची पडताळणी करेल यात शंका नाही.  जर खोटी माहिती देऊन या पीएम किसान योजनेचा पैसा लाटला असेल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. इतकेच नाहीतर जबाबदार अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनावर काहवाई केली जाणार आहे.

 


दरम्यान या योजनेच्या अंतर्गत ९४ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविण्यात आले आहेत. कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मते, भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी राज्य सरकार आणि केंद्राशी चर्चा करुन एक स्टॅडर्ड ऑपरेटिंग प्रणाली तयार करुन यास सदृठ करण्यात येणार आहे. दरम्यान सरकारने हे स्पष्ट केले आहे की, शेतकऱ्यांच्या कुटुंबांची ओळख करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे.

 दरम्यान तमिळनाडूमध्ये आतापर्यत ५.९५ लाख लाभार्थींचे बँक खाते तपासण्यात आले आहे. यात ५.३८ लाख बनावट लाभार्थी निघाले आहेत. त्याच्या बँक खात्यातून  ट्रान्सफर करण्यात आलेले पैसे वसूल करण्यात येत आहेत. तमिळनाडूतील ९६ करार करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा  संपविण्य़ात आली आहे. दरम्यान अपात्र लाभार्थीची नोंदणीसाठी जबाबदार असलेल्या ३४ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान तीन ब्लॉकमधील पाच कृषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा :  PM Kisan Samman Nidhi Yojana: लवकरच खात्यात येणार दोन हजार रुपये; पण 'ही' चुकी करा दुरुस्त

कोणाला नाही मिळत या योजनेचा लाभ

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर शेत जमीन असावी, पण जर तो व्यक्ती कुठे सरकारी नोकरीवर किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असेल तर तो व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसेल. यासह जर व्यक्ती माजी आमदार, खासदार किंवा मंत्री असेल तेही या योजनेसाठी पात्र नसतील. जर अर्ज करणारा  व्यक्ती हा परवानाधारक डॉक्टर असेल, अभियंता, वकील, चार्टट अकांउंटट  असेल तर तोही या योजनेस पात्र नसेल. यासह जर आपल्या  या योजनेच्या लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन असणे आवश्क असते.  जर शेत जमीन आजोबांच्या  किंवा शेतकऱ्याच्या वडिलांच्या  नावावर असेल तर योजनेचा लाभ मिळत नाही.

पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या नियमानुसार, जर आपली शेतजमीन ही शेती करण्यायोग्य आहे, पण आपण त्याचा उपयोग आपण दुसऱ्या गोष्टीसाठी करत आहात तर आपण या योजनेसाठी पात्र नाहीत.  यासह जर आपल्या कुटुंबातील कोणी सदस्य नोकरी करत असेल तर आपण या योजनेसाठी आपण अपात्र ठरणार.  जर आपण करदाते  असाल तर आपण यासाठी अपात्र ठरू शकता.

English Summary: Did the government scheme cost money by giving false information? Will be punished
Published on: 29 September 2020, 07:16 IST