चांगल्या भविष्यासाठी अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असतात. त्यामुळे आज आपण अशाच योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील आणि चांगला परतावा देखील मिळेल.
पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी अनेक नवनवीन योजना राबवत असते. यामधीलच एक योजना म्हणजे ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना. या योजनेत दररोज फक्त 95 रुपये जमा करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.
ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजनेत दररोज 95 रुपये जमा केल्यास मॅच्युरिटीनंतर जवळपास 14 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात. ही योजना ग्रामीण भागात राहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आहे. देशाच्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना विमा योजनेचा (Rural) लाभ मिळवून देण्याचा उद्देश या योजनेचा आहे.
26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भात यलो अलर्ट जारी
पोस्ट ऑफिसची ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना 1995 साली सुरू करण्यात आली. ही एक मनी बॅक पॉलिसी असल्यामुळे विमा घेणाऱ्या व्यक्तीला योजनेच्या कालावधीत मध्ये मध्ये काही रक्कम परत दिली जाते. दुर्दैवाने विमा घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला बोनससह 'सम अॅश्युअर्ड'ची पूर्ण रक्कम दिली जाते.
ही पॉलिसी 15 वर्षं आणि 20 वर्षं अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीच वय कमीत कमी 19 वर्षं असावे. या योजनेअंतर्गत 15 वर्षांच्या पॉलिसीमध्ये सहा वर्षं, नऊ वर्षं आणि 12 वर्षं पूर्ण झाल्यावर 20-20 टक्के रक्कम परत मिळते.
उडीद उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छे दिन! उडीदाला मिळतोय 10 हजारांवर बाजारभाव
इतका मिळतो परतावा
20 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 8, 12 आणि 16 वर्षांनी 20-20 टक्के रक्कम परत मिळते. विशेष म्हणजे मुदतपूर्तीनंतर बोनससह उर्वरित 40 टक्के रक्कमदेखील दिली जाते.
एखादी व्यक्ती 25 वर्षांची असेल आणि सात लाख रुपयांच्या विमा पॉलिसीमध्ये 20 वर्षांच्या मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा 2853 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.
म्हणजेच दररोज या व्यक्तीला सुमारे 95 रुपयांची बचत करावी लागणार आहे. सहा महिन्यांसाठी 17 हजार 100 रुपये, तर तीन महिन्यांसाठी 8850 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. मॅच्युरिटीनंतर गुंतवणूक दारांना 14 लाख रुपये मिळतील.
महत्वाच्या बातम्या
तुमच्या चालण्यावरून तुमचे तारुण्य ठरत असते; अशाप्रकारे चाललात तर तारुण्य राहील कायम
दिलासादायक बातमी! सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांत जमा होणार पीएम किसान योजनेचे पैसे
कौतुकास्पद! तब्बल 250 एकरवर गवती चहाची लागवड; 80 शेतकरी घेत आहेत लाखों रुपयांमध्ये उत्पन्न
Published on: 25 September 2022, 02:37 IST