Others News

एक तास राष्ट्रवादी पक्षासाठी या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर एका शेतकऱ्याने प्रांताधिकारी यांची तक्रार करून खळबळ उडवून दिली.

Updated on 10 May, 2022 2:46 PM IST

एक तास राष्ट्रवादी पक्षासाठी या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर एका शेतकऱ्याने प्रांताधिकारी यांची तक्रार करून खळबळ उडवून दिली. दादा, प्रांताधिकाऱ्यांनी भूसंपादनाच्या कामात पोटहिस्से करून दिले नाही, मुद्दाम अडथळा आणला. त्याने आमच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. असा आर्र्पोदरम्यान, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सभा काही काळासाठी तहकूब करण्यात आली.

अचानक घडलेल्या घडामोडींनी बैठकीचा सूर बदलला. दरम्यान, संबंधित भागात अद्याप वाटप झालेले नाही. भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. त्यामुळे हा आरोप चुकीचा असल्याचे प्रांताधिकारी यांनी तात्काळ अजित पवारांना समजावून सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी बारामती दौऱ्यावर आहेत.

शहरातील कार्यक्रम उरकून त्यांनी एक तास पार्टी' साठी काटेवाडी गाठले. भाषणाच्या सुरुवातीला श्रोत्यांमध्ये बसलेले काटेवाडी येथील शेतकरी अजित देवकाते यांनी अचानक उभे राहून तक्रार केली. त्यानंतर लगेचच प्रांताधिकारी पुढे आले आणि त्यांनी पवारांना समजावून सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी देवकाते यांना काम मार्गी लाऊन देतो असे सांगत, अजित, तुझे आणि माझे नाव एकच आहे. तरी मी अशा संयमाने बोलतो. तुम्हीही शांतपणे बोला, तुम्हाला जे वाटत आहे ते होईल', असे म्हणत पवार यांनी देवकाते यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

महत्वाच्या बातम्या
झूकेगा नहीं साला! अपयशाला नमवत सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी शेतीतून कमवले लाखों रुपये; वाचा ही भन्नाट यशोगाथा

English Summary: Complaint of state officer directly to Ajit Pawar
Published on: 10 May 2022, 02:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)