बऱ्याच दिवसापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याच्या बाबतीत अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. परंतु आता ही प्रतीक्षा संपण्याचा कालावधी आला असेच म्हणावे लागेल. कारण केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणारा सप्टेंबर महिना हा खूप आनंददायी ठरणार अशी चिन्हे आहेत.
जर आपण माध्यमांमध्ये आलेल्या बातम्याचा विचार केला तर येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या डीए अर्थात महागाई भत्ता यामधील वाढ तसेच असलेली थकबाकी आणि फिटमेंट फॅक्टर इत्यादी संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने याबाबतीत ठोस निर्णय घेतल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार मध्ये खूप मोठा बदल किंवा फायदा होणार आहे.
नक्की वाचा:7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार अडीच पटीने वाढणार!
इतकी होईल महागाई भत्त्यात वाढ
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ अपेक्षित असून या महिन्याच्या अखेरपर्यंत महागाई भत्ता त्यातील वाढीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती पण तसं काही झालं नाही.
परंतु आता सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना खुशखबर देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. जर आपण सध्या मिळणाऱ्या महागाईभत्ताचा विचार केला तर तो 34 टक्के असून यामध्ये चार टक्के वाढ होण्याची शक्यता असल्याने तो आता 38 टक्के होईल.
जर आपण मागील मागील महागाईभत्ता वाढीचा विचार केला तर ती तीन टक्के वाढ मार्च महिन्यात करण्यात आली होती व आधी असलेल्या 31 टक्क्यांवरून तो 34 टक्के झाला होता. कर्मचाऱ्यांची जे काही पगार असते त्या पगाराच्या असलेल्या रचनेमध्ये महागाई भत्ता हा एक महत्त्वपूर्ण भाग असतो.
जर आपण एकंदरीत मिळालेल्या माहितीचा विचार केला तर केंद्र सरकार 28 सप्टेंबर रोजी महागाई भत्ता जाहीर करेल व सप्टेंबर महिन्याच्याचे जे वेतन मिळेल त्यासोबत हा भत्ता दिला जाईल. तसेच कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची थकबाकी देखील मिळणार आहे.
नक्की वाचा:7th Pay Commission: कर्मचारी होणार लखपती! खात्यात येणार 2.18 लाख रुपये
Published on: 24 August 2022, 08:40 IST