Others News

कुठल्या ठिकाणी जेव्हा आपण नोकरी करतो. त्यासाठी आपण सगळ्यात आधी म्हणजे आपल्या कामाचा कालावधी काय आहे? मिळणारे वेतन आणि सुट्ट्यांच्या स्वरूप या व इतर गोष्टींचा बारकाईने विचार करतो. कारण या सगळ्या गोष्टींवर एक कामाचे स्वरूप देखील अवलंबून असते. तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता त्या ठिकाणाचे सगळे कामाच्या बाबतीत नियम हे लेबर कोड नुसार असतात.

Updated on 11 September, 2022 1:25 PM IST

कुठल्या ठिकाणी जेव्हा आपण नोकरी करतो.  त्यासाठी आपण सगळ्यात आधी म्हणजे आपल्या कामाचा कालावधी काय आहे? मिळणारे वेतन आणि सुट्ट्यांच्या स्वरूप या व इतर गोष्टींचा बारकाईने विचार करतो. कारण या सगळ्या गोष्टींवर एक कामाचे स्वरूप देखील अवलंबून असते. तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता त्या ठिकाणाचे सगळे कामाच्या बाबतीत नियम हे लेबर कोड नुसार असतात.

त्यामुळे या महत्त्वाच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आता नवीन लेबर कोड आणण्याच्या तयारीत असून देशातील नोकरदार वर्गाच्या कामांमध्ये बद्दल होईल असे नियम लागू करण्याच्या तयारीत सरकार आहे.

नक्की वाचा:7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठी भेट! DA सह पगारही वाढणार

 हा नवीन लेबर कोड लागू करण्यात येईल हे पक्के आहे परंतु कधीपासून हे मात्र अजून निश्चित नाही. हा नवीन लेबर कोड सर्व राज्यातून देखील लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या लेखात आपण या नवीन लेबर कोडमध्ये काय काय बदल होऊ शकतात हे पाहू.

 आठवड्यातील सुट्टीचे स्वरूप

 जर आपण  केंद्र सरकारकडून लागू करण्यात येणार असलेल्या नवीन लेबर कोडचा विचार केला तर यामध्ये आठवड्यातून तीन दिवस सुट्टी राहणार असून चार दिवस कामाचे असणार आहेत.

 सुट्टीबाबत काही महत्त्वाचे निर्णय

 सध्याच्या परिस्थितीत जर तुम्ही कुठल्याही संस्थेत काम करत असाल आणि तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी सुट्टी हवी असेल तर संबंधित कर्मचाऱ्याला कमीत कमीत या संस्थेत 240 दिवस काम करणे आवश्यक आहे. परंतु या नवीन लेबर कोड आल्यानंतर 180 दिवस काम करून देखील कर्मचाऱ्यांना दीर्घ सुटीचा लाभ मिळू शकणार आहे.

नक्की वाचा:Epfo Update: हातमजुरी करणाऱ्यांना देखील मिळणार तीन हजार रुपये पेन्शन? काय आहे एपीएफओचा प्लान?

 ग्रेच्युइटीचे पैसे मिळू शकतात जास्त

 जर तुमचा मूळ पगार जास्त असेल तर तुमचा प्रॉव्हिडंट फंड देखील वाढणार असून सरकारच्या या नियमामुळे कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंटच्या वेळी एक मोठा फंड म्हणजेच रक्कम मिळणार असून त्यासोबत ग्रॅच्युईटीचे पैसे देखील जास्त प्रमाणात मिळणार आहेत.

 पगाराच्या स्वरूप

 नवीन लेबर कोड सारखाच नवीन वेज कोड भारतात नवीन वेतन सहिता लागू झाली तर हातात जे काही तुमची पगार येते त्यापेक्षा कमी पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील. याबाबत सरकारची नवीन कायद्यानुसार तरतूद आहे की कोणताही कर्मचाऱ्याची मूळ पगार त्याच्या एकूण पगारीच्या 50 टक्के किंवा त्याहून अधिक असावी.

नवीन लेबर कोड मध्ये समाविष्ट इतर कोड

या नवीन लेबर कोडमध्ये सामाजिक सुरक्षितता,पगार म्हणजेच वेतन,औद्योगिक संबंध तसेच व्यावसायिक सुरक्षितता असे चार नवे लेबर कोड देखील केंद्र सरकारकडून अमलात आणले जाण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा:Farmer Scheme : बातमी कामाची! पीएम किसान योजनेच्या 12व्या हफ्त्याआधी शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांचं कर्ज, असा करा अर्ज

English Summary: central goverment can apply to new labour code for employees
Published on: 11 September 2022, 01:25 IST