Others News

स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु घर बांधणेही सद्यपरिस्थितीत सोपी गोष्ट राहिली नसून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर मी बाब गेली आहे. कारण आपल्याला माहित आहेच कि घर बांधण्यासाठी लागणाऱ्या स्टील,सिमेंट, वाळू तसेच विटांपासून असणाऱ्या साहित्याचे दर प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे घर बांधणे ही गोष्ट खूप अवघड होऊन बसले आहे.

Updated on 26 August, 2022 1:57 PM IST

स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु घर बांधणेही सद्यपरिस्थितीत सोपी गोष्ट राहिली नसून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर मी बाब गेली आहे. कारण आपल्याला माहित आहेच कि घर बांधण्यासाठी लागणाऱ्या स्टील,सिमेंट, वाळू तसेच विटांपासून असणाऱ्या साहित्याचे दर प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे घर बांधणे ही गोष्ट खूप अवघड होऊन बसले आहे.

नक्की वाचा:धक्कादायक! शेती विकूनही कर्ज संपेना; एकाच साडीला पती-पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या

परंतु जर आता कुणाला घर बांधायचे असेल तर त्यांच्यासाठी ही बातमी खूप आनंदाची व महत्त्वपूर्ण असून घर बांधण्यासाठी आवश्यक असलेले सिमेंट आणि बारच्या किमतीमध्ये कमालीची घसरण झाली आहे. यामागे असलेल्या कारणांचा विचार केला तर सरकारने उचलली काही ठोस पावले आणि मान्सून मुळे मागणी नसल्यामुळे ही घसरण झाली आहे.

नक्की वाचा:Gadkari Announcement:छोटे गुंतवणूकदार देखील होतील मालामाल,असा आहे नितीन गडकरींचा प्लॅन

न्यूज 18 लोकमतच्या बातमीनुसार आपण विचार केला तर बारची किरकोळ किंमत 65 हजार रुपये प्रतिटन झाली असून एप्रिल मध्ये ती 75 हजार रुपये प्रतिटन होती.

म्हणजे तब्बल दहा हजार प्रतिटन घसरण झाली आहे. तसेच काही ब्रांडेड बारची किंमत एक लाख रुपये प्रतिटन होती ती आता तब्बल प्रतिटन 15 हजाराने घसरून 85 हजार प्रती टनांपर्यंत आले आहे.

 सिमेंटचे दरही घसरले

जर आपण सिमेंटच्या दराचा विचार केला तर एप्रिल महिन्यामध्ये 50 किलोची बॅगने चारशे पन्नास रुपयांचा टप्पा ओलांडला होता परंतु ती आता थेट पन्नास रुपयांनी घसरून चारशे रुपयांपर्यंत मिळत आहे.  तसेच टाइल्स, विटांच्या दरदेखील कमी झाले आहेत.

नक्की वाचा:Eknath shinde: एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी घेतले 'हे' महत्त्वाचे काही निर्णय, वाचा सविस्तर

English Summary: cement,steel and bricks rate is decrease so get benifit to people
Published on: 26 August 2022, 01:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)