सध्या विविध प्रकारचे सण तोंडावर आले असताना बाजारामध्ये विविध प्रकारच्या चांगल्या डील येऊन ठेपल्या आहेत. अगदी अशीच डील 'वनप्लस' स्मार्टफोनच्या बाबतीत आली असून ती खूप फायदेशीर आहे. या डीलच्या सहाय्याने तुम्ही 'वनप्लस नोर्ड CE 2 Lite 5G' हा स्मार्टफोन खूप चांगल्या डिस्काउंट मध्ये खरेदी करू शकतात.
अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल
अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलच्या ब्लॉकबस्टर डीलच्या माध्यमातून हा स्मार्टफोन बँकेच्या ऑफर सोबत 19999 रुपयांऐवजी 16999 रुपयांना तुम्हाला मिळू शकतो. एवढेच नाही तर हा फोन खरेदी करणारे जे काही ग्राहक आहेत त्यांना कंपनी ऍमेझॉन पे एक हजार 500 रुपयांचे रिवॉर्ड देखील देणार आहे.
तसेच या डीलमधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये एक्सचेंज ऑफरमध्ये फोन खरेदी केला तर चौदा हजार 250 रुपये पर्यंतचा फायदा देखील मिळणे शक्य आहे. ॲमेझॉनचा हा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 23 सप्टेंबर म्हणजेच आज पासून सुरू होणार आहे.
नक्की वाचा:व्हा स्मार्ट! ऑनलाइन पेमेंट करताना 'या' तीन गोष्टींचे करा पालन, वाचा फसवणुकीपासून
नेमका कसा आहे हा फोन?
जर आपण या स्मार्टफोनचा विचार केला तर या फोनचा डिस्प्ले 6.59 इंचाचा असून 20:9 च्या ऑस्पेक्ट रेशो आणि 120 Hz चा रिफ्रेश रेटसह येतो. हा फोन आठ जीबी पर्यंत LPDDR4x रॅम आणि 128 जीबी UFS 2.2 स्टोरेज पर्याय मध्ये उपलब्ध आहे. तसेच या फोनच्या मागील बाजूस उत्तम फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅश सोबत तीन कॅमेरे आहेत.
यामध्ये 2 मेगापिक्सल डेप्थसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येतो. तसेच या फोनची बॅटरी 33W SUPERVOOC चार्जिंग ला सपोर्ट करते.
नक्की वाचा:Important: व्यावसायिकांसाठी 'मनी इन्शुरन्स' असतो संकट काळात मोठा आर्थिक आधार,वाचा महत्व
Published on: 23 September 2022, 01:25 IST