सध्या जमिनीचे भाव गगनाला पोहोचले आहेत. जमीन किंवा एखादा प्लॉट घेणेम्हणजे फारच दिव्य आहे. परंतु अशा परिस्थितीत जर तुम्ही ऐकले ती अवघ्या सहा हजार मध्ये चंद्रावर एकर जमीन मिळत असेल तर.. अक्षरशा डोकं चालण बंद होईल.
परंतु हे खरं आहे. परंतु यासाठी खूपच मोठी खटपट करावी लागणार आहे हेही तितकेच खरे. चंद्रावर जमीन घेतली तर खरेदीखतही रीतसररीतीने करण्यात येते. चंद्रावर एक एकर जमीन अवघ्या सहा हजार मध्ये मिळतेआपण आता वाचले.परंतु नेमकी ही जमीन कोणी आणि कश्या पद्धतीने घेतली हे आता आपण पाहू.
नेमके काय आहे हे प्रकरण? ते पाहू
14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. यामध्येअनेकजण आपल्या आवडत्या व्यक्तीला काही ना काही भेटवस्तू देतात. परंतु या दिवसाचे औचित्य साधून त्रिपुरातील एका प्राध्यापकांने स्वतःच स्वतःला एक व्हॅलेंटाईन भेट केली आहे. ही अनोखी भेट म्हणजे चंद्रावरची एक एकर जमीन.
विशेष म्हणजे या प्राध्यापकांनी ही जमीन अगदी अल्प किमतीत म्हणजे सहा हजार रुपयांमध्ये खरेदी केली आहे. सुमन देबनाथ असे या प्राध्यापकाचे नाव असून ते गणित विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी एक एकर जमीन चंद्रावर खरेदी केली असून याजमिनीचे खरेदीचे कागदपत्र लवकरच मिळणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.परंतु हा व्यवहार कुणासोबत आणि कसा केलाहे पाहणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
नक्की वाचा:मक्याचे पिकाआड भलतेच काही! शेती वर पोलिसांचा छापा आणि शेतकऱ्यास अटक
त्यांच्या माहितीनुसार इंटरनॅशनल लूनर सोसायटी चंद्रावरील जमीन खरेदी विक्रीचे बाबत करार करते. या सोसायटीच्या माध्यमातूनया प्राध्यापकांनी चंद्रावर अवघ्या सहा हजारात हा व्यवहार पूर्ण केला.एवढेच नाही तर या रकमेत त्यांना शिपिंग आणि पीडीएफ चार्ज देखील आकारण्यात आला आहे. इंटरनॅशनल लूनर सोसायटीच्या माध्यमातून चंद्रावरील जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
अनेक सेलिब्रेटींनीचंद्रावर जमीन खरेदी केलेली आहे.यामध्ये अभिनेता सुशांत सिंग यांचाही समावेशआहे. नाशिकमधील एका मित्राने देखील काही दिवसापूर्वी आपल्या मित्राला बर्थडे गिफ्ट म्हणून चंद्रावर जमीन दिली होती.( संदर्भ- कृषीरंग)
Published on: 22 March 2022, 11:54 IST