कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना एक महत्त्वाच्या प्रपोजलवर काम करत असून या माध्यमातून आता ईपीएफओ कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पगाराची जी काही मर्यादा आहे ती रद्द करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. विशेष म्हणजे आता नवीन प्रस्ताव आणला गेला आहे त्या माध्यमातून कामगार आणि स्वयंरोजगार असलेल्या लोकांसाठी देखील योजना लागू करण्याचा विचार केला जात आहे.
नक्की वाचा:Epfo News: 'डिजिलॉकर' आता कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या सदस्यांच्या मदतीला,होईल फायदा
जर आपण याचा अर्थ पकडला तर ज्या लोकांचा पगार पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि ज्या कंपनीत 20 पेक्षा कमी कर्मचारी आहेत त्यांनादेखील आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या निवृत्ती योजनेत समाविष्ट केले जाऊ शकते.
यासाठी वेगवेगळ्या विभागांची चर्चा करण्यात येत असून त्यासंबंधीची माहिती राज्यांना देखील पोचवण्यात आली आहे.
निवृत्ती योजनेचे आताचे नियम काय आहेत?
सध्याच्या नियमांचा विचार केला तर ज्याचा पगार पंधरा हजार रुपये आहे असे कर्मचारी ईपीएफओ योजनेचा लाभ घेऊ शकतात व ज्या कंपनीमध्ये कमीत कमी वीस कर्मचारी कामाला आहेत ते कर्मचारी या योजनेत समाविष्ट करू शकतात.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी यांनी 1952 मध्ये हजार रुपये आणि वीस कर्मचाऱ्यांचे असलेली वेतन मर्यादा काढून टाकण्यासाठी सुधारणा करावी लागेल.
नक्की वाचा:Epfo Rule: पीपीओ नंबर आणि पेन्शन यांचा काय आहे संबंध? हा नंबर कसा मिळतो? वाचा सविस्तर
जेव्हा हा बदल अमलात आणला जाईल तेव्हा स्वयंरोजगार असलेले लोक देखील या योजनेत समाविष्ट होऊ शकते. या बदलानंतर पगाराचा नियम आणि कर्मचाऱ्यांची जे काही अनिवार्य संख्या आहे ती देखील रद्दबातल केली जाईल. या बदलानंतर कोणतेही उत्पन्न किंवा पगार आणि कितीही कर्मचारी संख्या असलेली कोणतीही कंपनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मध्ये समाविष्ट होऊ शकते.
दुसरीकडे एका समितीने ईपीएफ वेतन मर्यादा 15 हजार रुपयावरून 21 हजार रुपये करण्याची सूचना केली आहे परंतु सदर समितीची शिफारस जर मान्य झाली तर ही वेतन मर्यादा 21 हजार रुपये होते. या अगोदर वेतन मर्यादा 2014 मध्ये वाढविण्यात आली होती व ही वेतनवाढ नवव्यांदा करण्यात आली होती.
नक्की वाचा:Market News: नाफेडची खुल्या बाजारात हरभरा विक्रीची तयारी, हरभऱ्याचे दर घसरण्याची शक्यता?
Published on: 31 August 2022, 02:20 IST